Russia-Ukraine युद्धाविरोधात रशियातील लोकं रस्त्यावर, पुतिन यांच्याविरोधात निदर्शनं

Russia Ukraine War चे पडसाद आता रशियामध्ये ही उमटू लागले आहेत. पुतिन यांना त्यांच्याच देशात विरोधाचा सामना करावा लागत आहे.

Updated: Feb 25, 2022, 01:25 PM IST
Russia-Ukraine युद्धाविरोधात रशियातील लोकं रस्त्यावर, पुतिन यांच्याविरोधात निदर्शनं title=

मॉस्को : युक्रेनवर हल्ला करून (Russia-Ukraine War) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्याच घरात विरोधाचा सामना करावा लागत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोसह 51 शहरांमध्ये पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धाविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्याच्या नावाखाली पोलिसांनी निदर्शने दडपण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 1400 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (protest in russia against putin and war)

मॉस्को येथून 700 जण ताब्यात

आमची संलग्न वेबसाईट WION मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, मोठ्या संख्येने लोक रशियाच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. 51 शहरांमध्ये सुमारे 1400 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी एकट्या मॉस्कोमधून सुमारे 700 आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये 340 हून अधिक निदर्शकांना अटक केली आहे. हे लोक युद्धाला विरोध करत आहेत आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याची मागणी करत आहेत.

संसदे बाहेरही आंदोलन

गुरुवारी सोशल मीडियावर लोकांना युद्धाच्या विरोधात आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर बघता बघता बघ्यांची गर्दी झाली. त्यांच्या हातात 'नो टू वॉर' असे फलक असलेले बॅनर-पोस्टर दिसत होते. रशियन संसदेबाहेरही मोठ्या संख्येने निदर्शक जमले होते, असे सांगण्यात येत आहे.

पुतीन यांच्या विरोधात सर्वात मोठ्या निदर्शनाचे नेतृत्व करणारे अॅलेक्सी नवलनी देखील सध्या तुरुंगात आहेत. ते अडीच वर्षांची शिक्षा भोगत आहे. नवलनी यांनी रशिया-युक्रेन युद्धाविरोधात एक व्हिडिओही जारी केला आहे. रशियामध्ये पसरलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी युक्रेनविरुद्ध युद्ध छेडण्यात आल्याचे त्यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनलला सांगितले आहे. या युद्धातून रशियातील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.