बाल्कनीत पती-पत्नीची तुफान हाणामारी! अचानक Balcony Railing तुटलं अन्...; 'त्या' दोघांवर चालणार खटला

Husband Wife Fall From Balcony: दोघेही भांडत भांडत बाल्कनीमध्ये आले आणि तिथे एकमेकांना मारु लागले. याचवेळी बाल्कनीची रेलिंग तुटली. हा सारा घटनाक्रम कॅमेरात रेकॉर्ड झाला.

Updated: Feb 23, 2023, 08:38 PM IST
बाल्कनीत पती-पत्नीची तुफान हाणामारी! अचानक Balcony Railing तुटलं अन्...; 'त्या' दोघांवर चालणार खटला title=
Couple Fall

Husband Wife Fight Video: पती आणि पत्नीचा वाद हा कशावरुन होईल हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा केवळ रागावणं तर कधीतरी अगदी कडाक्याचं भांडण हे पती-पत्नीच्या नात्याचं अविभाज्य भाग असल्यासारखं असतं. मात्र हे भांडण अगदी हणामारीपर्यंत गेलं तर विपरित आणि गंभीर परिणाम होतात. त्यातही हे भांडण सार्वजनिक झालं तर अधिकच गोची. असाच काहीसा प्रकार रशियामध्ये घडला. पती-पत्नी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये भांडत असताना बाल्कनीची जाळी मोडली. त्यानंतर एकमेकांना हणामारी करणारे हे दोघेजण थेट दुसऱ्या मजल्यावरुन इमारतीखालील फुटपाथवर पडलं. जवळजवळ 25 फूट उंचीवरुन हे जोडपं खाली पडलं. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून हा सर्व घटनाक्रम कॅमेरात रेकॉर्ड झालाय. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या दोघांविरोधात चालणार खटला

बरं आता हे सारं वाचून तुम्हाला या दोघांबद्दल सहानुभूती वाटत असली तर आता या दोघांविरोधातच खटला चालवला जाणार आहे. यामागील कारण म्हणजे ज्या बाल्कनीचं नुकसान या दोघांच्या भांडणामुळे झालं आहे ती इमारत 1883 साली उभारण्यात आलेली इमारत असून सध्या एक ऐतिहासिक इमारत म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच ऐतिहासिक इमारतीला नुकसान पोहचवल्याने या दोघांविरोधात खटला चालवला जाणार आहे. 

कोणी शूट केला व्हिडीओ?

समोर आलेल्या माहितीनुसार या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलाचं नाव एव्हगेनी कार्लागिन असं आहे. तर पुरुषाचं नाव ओलग्ना वोल्कोवा आहे. हे दोघेही सेंट पीटर्सबर्गमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्यामध्ये एका शुल्ल कारणावरुन वाद झाला आहे. बाचाबाचीपासून सुरु झालेला वाद काही मिनिटांमध्ये हाणामारीपर्यंत पोहचला आणि ते बाल्कनीत येऊन एकमेकांना मारु लागले. या बाल्कनीच्या खालीच फुटपाथ आणि लगेच त्याला लागून रस्ता आहे. दोघेही बाल्कनीत एकमेकांना मारत असताना रस्त्यावरुन कोणीतरी या दोघांचा व्हिडीओ शूट केला.

दोघांनाही गंभीर दुखापत

ही महिला पुरुषाला मारताना बाल्कनीच्या रेलिंगवर भार देते. त्यामुळे हे रेलिंग तुटतं आणि ही महिला या पुरुषासहीत दुसऱ्या मजल्यावरुन खाली फुटपाथवर पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नी काँक्रिटच्या ढिगाऱ्यावर पडल्याची आणि पती फुटपाथवर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र इमारतीची पडझड झाल्याने या दोघांविरोधात खटला चालवला जाणार असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. या दोघांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांचेही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. 

खटला चालवण्यामागील मुख्य कारण हे...

आता सेंट पीटर्सबर्ग प्रशासनाने ही तुटलेली बाल्कनी दुरुस्त करण्यायोग्य राहिलेली नाही असा अंदाज व्यक्त करताना या बाल्कनीची डागडुजी होऊ शकते का याबद्दलचा तपास सुरु केला आहे. एका अधिकाऱ्याने इमारतीचं नुकसान केल्याप्रकरणी या दोघांवर खटला चालवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही इमारत शहरप्रशासनाच्या देखरेखीखाली येते आणि प्रशासनाच्या यादीनुसार ही इमारत ऐतिहासिक जागेवर बांधण्यात आली असल्याने जोडप्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.