युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !

Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे.  

Updated: Feb 28, 2022, 08:56 PM IST
युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !  title=

मास्को : Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे. पुतीनचा शेफ म्हणून ओळखला जाणाऱ्या एका मास्टरमाईंडने झेलेन्स्कींची सुपारी घेतली आहे. (Russia Ukraine Conflict) 

बॉम्ब, हल्ले, रॉकेटस, मिसाईल्सचा नुसता मारा सुरु केले. या हल्ल्याचे मुख्य टार्गेट एकच. व्होलोडिमिर झेलेन्स्की. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष. झेलेन्स्कींचे काम तमाम करण्यासाठी रशियाने तब्बल 400 डेंजर कॉन्ट्रॅक्ट किलर युक्रेनमध्ये पाठवलेत. टार्गेट वन झेलेन्स्की. टार्गेट टू. झेलेन्स्की यांचे कुटुंबीय. (Russian attack : Russia has super-planned how to kill Ukrainian President Volodymyr Zelensky )

आफ्रिकेतला खतरनाक दहशतवाद्यांचा गट वॅगनरला झेलेन्स्कींच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. येवगेनी प्रिगोझिन हा या दहशतवादी गटाचा म्होरक्या आहे. तो पुतीनच्या अत्यंत जवळचा समजला जातो. पुतीनचा शेफ अशी त्याची ओळख आहे. 

झेलेन्स्कींच्या हत्येसाठी 400 किलर्स 

येवगेनी प्रिगोझिननं काही दिवसांपूर्वी पुतीनची भेट घेतली. मिशन झेलेन्स्की खात्मासाठी मोठी रक्कम पुतीनकडून घेतल्याची चर्चा आहे. या दहशतवाद्यांना हाय लेव्हल ट्रेनिंग देण्यात आले आहे. पुतीनचा ग्रीन सिग्नल मिळताच काम तमाम होणार आहे. टार्गेटच्या लिस्टमध्ये झेलेन्स्कींसह, युक्रेनची कॅबिनेटही आहे.

वॅगनर ग्रुपने ही ऑफर धुडकावली 

सध्या 400 कॉन्ट्रॅक्ट किलर्स युक्रेनमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी युक्रेनच्या बाहेर पडावे, अशी ऑफरही अमेरिकेने दिल्याचे बोलले जात आहे. मात्र वॅगनर ग्रुपने ही ऑफर धुडकावली. आम्ही युद्ध करतो, पळून जात नाही, असं वॅगनरनं अमेरिकेला ठणकावले आहे. 

जागतिक स्तरावरील दहशतवादी असलेल्या वॅगनर ग्रुपने आफ्रिका आणि मिडल ईस्टमध्ये अशी बरीच कामे तमाम केली आहे. युक्रेनमध्ये ठाण मांडून बसलेले वॅगनरचे दहशतवादी झेलेन्स्कींची प्रत्येक हालचाल आणि फोन टिपतायत. सध्या त्यांना वेट अँड वॉचचा इशारा देण्यात आला आहे. ग्रीन सिग्नल मिळताच पुतीनचा हा शेफ नकाशावरचा एक देशच पुसून टाकेल की काय, याची भीती आहे.