Russia ukraine war : रशिया - युक्रेनमधील युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. तरी दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष सुरूच आहे. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) रशिया आणि युक्रेनबाबतही सुनावणी करत आहे. रशियाने या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. रशियाचा एकही प्रतिनिधी येथे पोहोचला नाही.
आज रशियाने आपल्या शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. यामध्ये अमेरिका, युक्रेनसह 31 देशांचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धावर अजूनही कोणतीही सकारात्मक चर्चा दोन्ही देशांमध्ये झालेली नाही. दोन्ही देश मागे हटायला तरार नाहीत. त्यातच आता रशियाने यूक्रेनसमोर युद्ध थांबवण्यासाठी 4 अटी ठेवल्या आहेत.
रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या 4 अटी
रशियाने युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्याचं मान्य केलंय. पण यासाठी यूक्रेनला रशियाच्या 4 अटी मान्य कराव्या लागणार आहे. यूक्रेन जर या 4 अटी मान्य करतो तर हे युद्ध त्वरित थांबवले जाईल, असे रशियाने म्हटले आहे. युक्रेनियन मीडियाने त्या 4 अटी कोणत्या आहेत. याबद्दल माहिती दिली आहे.
1. लष्करी कारवाई थांबवा.
2. तटस्थ राहण्यासाठी संविधान बदलले पाहिजे.
3. क्रिमियाला (crimea) रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्या.
4. Donetsk आणि Luhansk यांना स्वतंत्र देश म्हणून ओळख द्या.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरुन चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांना थेट चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आता दोन्ही देशाचे प्रमुख काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.