फायद्याची बातमी; चहा- कॉफीमध्ये बिस्किट बुडवण्याची योग्य पद्धत माहितीये?

छान वाफाळणारा चहा किंवा कॉफी आणि मग त्यामध्ये बिस्कीट बुडवून ते खाण्याची मजा काही औरच.   

Updated: Jun 2, 2022, 08:45 AM IST
फायद्याची बातमी; चहा- कॉफीमध्ये बिस्किट बुडवण्याची योग्य पद्धत माहितीये?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी हातात चहाचा कप, समोर बिस्कीटचा पुडा असला म्हणजे अनेकांचाच तो वेळ सार्थकी लागतो. छान वाफाळणारा चहा किंवा कॉफी आणि मग त्यामध्ये बिस्कीट बुडवून ते खाण्याची मजा काही औरच. (right way to dunk biscuits in tea or coffee watch video)

याच मजेची सजा तेव्हा होते ज्यावेळी चहामध्ये बुडवलेलं बिस्कीट चहात पडतं आणि तिथेच विरघळून जातं. 

चहामध्ये बिस्कीट तुटून पडल्यानंतर सर्वांचाच चेहरा पाहण्याजोगा असतो. कधीकधी अनावधानानं बिस्कीट आत पडल्यामुळं चहा कपबाहेर उडतो. तर,  कधीकधी ते बिस्कीट कपऐवजी आपल्या अंगावर पडतं. 

म्हणजे कपपासून तोंडापर्यंतचं अंतरही ते पूर्ण करत नाही. अशातच अनेकदा कपड्यांवर चहात बुडालेलं बिस्कीट पडल्यामुळं डागही पडतात. आता मुद्दा असा, की यात चूक कोणाची? बिस्कीटाची की तुमची? 

अर्थात ही बिस्कीटाची चूक नाही. कारण, तुम्ही आजवर ते चुकीच्या पद्धतीनं चहात बुडवत आलात आणि कायमच तुमचीच फजिती होत राहिली. 

बीबीसी रेडिओनं सोशल मीडियावलर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये बिस्कीट बुडवण्याची योग्य पद्धत दाखवण्यात आली आहे. 

1998 मध्ये काही वैज्ञानिकांनी बिस्कीट चहामध्ये कसं बुडवावं याची योग्य पद्धत दाखवली होती. जिथं बिस्कीट अगदी सरळ दिशेनं चहामध्ये बुडवण्याऐवजी ते चहाशी समांतर चहात बुडवावं. जेणेकरून बिस्कीटाच्या वरची बाजू सुकी राहील आणि ते खाण्याआधीच चहात पडणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BBC Radio 2 (@bbcradio2)

हातात चहाचा प्याला आहे? बघा हा प्रयोग करुन.