नेपाळमध्ये राजकीय पेच आणखी तीव्र, ओली यांच्या अनुपस्थितीत स्थायी समितीची बैठक

भारत (India) विरोधात आपली खुर्ची पणाला लावली आहे ते नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (K. P. Sharma Oli) यांची सत्ता जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

Updated: Jul 30, 2020, 10:29 AM IST
नेपाळमध्ये राजकीय पेच आणखी तीव्र, ओली यांच्या अनुपस्थितीत स्थायी समितीची बैठक  title=

काठमांडू : भारत (India) विरोधात आपली खुर्ची पणाला लावली आहे ते नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (K. P. Sharma Oli) यांची सत्ता जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. चीनच्या सर्व प्रयत्नानंतर ओली आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकुमार दहल  तथा ​​प्रचंड (Pushpa Kamal Dahal -Prachanda) यांच्यातील विरोध संपलेला नाही. ओली यांच्या गैरहजेरीत स्थायी समितीची बैठक पुष्पकुमार यांनी घेतली. त्यामुळे ओली यांना पाय उतार होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पंतप्रधान ओली यांच्याच निवासस्थानी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला ओली हे उपस्थित नव्हते. त्यांच्याच अनुपस्थितीत प्रचंड यांनी हे स्पष्ट केले आहे की, पक्षात ओलीबद्दल असंतोष वाढत आहे आणि त्यांना आता जावे लागेल. प्रचंड आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मंगळवारी सकाळी अकरा वाजता पूर्वनियोजित वेळापत्रकात पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले पण ओली उपलब्ध नसताना प्रचंड यांनी त्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतली.

काठमांडू पोस्टच्या अहवालानुसार, यापूर्वी पंतप्रधानांच्या पत्रकार सल्लागार सूर्य थापा यांनी ही बैठक तहकूब केली होती, असे सांगितले होते. परंतु स्थायी समितीच्या सदस्या मातृका यादव यांनी पंतप्रधानांनी नकार दिला तरी बैठक कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रचंड आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते झलनाथ खनाल हे बैठकीसाठी ओली यांना भेटण्यासाठी आले होते, पण त्यांना 'त्यांनी सांगितले की, त्यांना जे करायचे आहे ते करु दे' असे सांगण्यात आले. यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधान ओली यांच्या शिवाय बैठक घेतली, त्यात २९ स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. तथापि, पंतप्रधान ओली यांचे निकटचे नेते या बैठकीपासून दूर राहिले.

गेल्या आठवड्यात बुधवारी स्थायी समितीचे सदस्य पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी पोहोचले. तथापि, ओलीदेखील त्या बैठकीस अनुपस्थित होते. म्हणूनच, २८ जुलै रोजी समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु यावेळीही ओली अनुपस्थित राहीलेत. पंतप्रधान ओली यांनी वारंवार बैठक घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यात पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र संताप वाढला आहे.

पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ म्हणाले की पंतप्रधान ओली यांची अशाप्रकारे बैठक तहकूब करणे अयोग्य आणि पक्षाच्या विरोधात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या अजेंडावर चर्चा झाली नाही, परंतु पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांना स्थायी समितीची बैठक बोलावण्याची जबाबदारी सोपविली आहे.

महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान ओली यांच्याविरूद्ध अनावश्यकपणे भारताशी सीमेवरील वाद आणि नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढविण्याबद्दल पक्षासह लोकांमध्ये तीव्र संताप वाढला आहे. त्यांच्या धोरणांच्या विरोधात बरीच निदर्शने झाली आहेत. ओली यांनी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर राहावे, अशी चीनची इच्छा आहे आणि त्यासाठी ते चाल खेळत आहेत. परंतु प्रचंड ज्याप्रकारे ओलीयांच्याशिवाय स्थायी समितीची बैठक घेतली त्यावरून ओली यांची कारकीर्द संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत.