स्टीफन हॉकिंगना कधीच का नाही मिळाला नोबेल पुरस्कार ?

आजारावर मात करून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य गोष्टी स्टीफन हॉंकिंग यांनी शक्य करून दाखवल्या.

Updated: Mar 14, 2018, 04:03 PM IST
स्टीफन हॉकिंगना कधीच का नाही मिळाला नोबेल पुरस्कार ?  title=

मुंबई : आजारावर मात करून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य गोष्टी स्टीफन हॉंकिंग यांनी शक्य करून दाखवल्या.

विश्वाच्या निर्मितीचं गूढ उकलण्यासाठी स्टीफन यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे. मात्र तरीही त्यांच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला नाही.  

का नाही मिळाले नोबेल ? 

नॅशनल जिओग्राफिक मॅगझीन 'द सायन्स ऑफ लिबर्टी'चे लेखक टिमोथी फेरिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीफन यांची कृष्णविवरावरील सिद्धांत भौतिकशास्त्रामध्ये मानण्यात आली आहेत परंतू त्याची मानकं नसल्याने ती प्रत्यक्षात सिद्ध झालेली नाही. जर त्याचे प्रत्यक्षात अनुभव घेता आले असते तर कदाचित स्टिफन यांच्या नावाचा नोबेल पुरस्कारासाठी विचार करता आला असता. 

स्टिफन हॉकिंग यांनी मांडलेले निष्कर्ष पुढील अब्जावधी वर्षांतही पाहता येणार नाहीत. 

अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले स्टीफन हॉकिंग 

स्टीफन हॉकिंग यांच्याकडे १२ सनद पदव्या आहेत. हॉकिंग्ज यांचं कार्य पाहून अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हे अंतराळातील रहस्यांवर आधारीत पुस्तक चांगलंच गाजलं होतं. 

१९७४ मध्ये ब्लॅक होल्सवर असाधारण रिसर्च करून त्यांनी धमाका उडवून दिला होता. महत्वाची बाब म्हणजे स्टीफन हॉकिंग यांचा मेंदू सोडून त्यांच्या शरीराचं एकही अंग काम करत नव्हतं. स्टीफन हॉकिंग यांनी ‘द ग्रॅन्ड डिझाईन’, ‘यूनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थेअरी ऑफ एअरीथिंग’ अशी पुस्तके लिहिली आहेत.