जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास

Rare First Edition Harry Potter Book: एका पुस्तकाची विक्री तब्बल 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. 32 रुपयांच्या पुस्तकाला लाखो रुपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 16, 2023, 05:24 PM IST
जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास title=
Rare First Edition Harry Potter Book Bought For Rs 32 Gets Sold For Rs 11

Bought for Rs 32 and sold for Rs 11 lakh Book: जुनं ते सोनं ही म्हण तसं म्हणायला गेलं तर खरीच आहे. कारण जुन्या गोष्टींचे महत्त्व त्यांनाच कळते ज्यांना त्याबाबत प्रत्येक गोष्ट माहिती असते. अनेक लोकांना जुन्या आणि पुरातन गोष्टी जपण्याचा छंद असतो. कधीकधी अशा जुन्या व पुरातन गोष्टींची किंमतही चांगली येते. असाच एक प्रकार युकेमध्ये समोर आला आहे. 32 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या पुस्तकाची 11.26 लाखांमध्ये विक्री करण्यात आली आहे. तर, हे पुस्तक खरेदी करणाऱ्यानेही ही व्यवहाराने नफा झाल्याचे म्हटलं आहे. 

26 वर्षांनंतर पुस्तकाची विक्री करण्यात आली

असं म्हणतात की, अनेक जन्या वस्तुंमुळं नशीब फळफळते. अशाच प्रकारची ही घटना आहे ज्याबाबत कळल्यावर तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. 1997मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाची एक प्रत ग्रंथालयाने सांभाळून ठेवली होती. त्यानंतर याच पुस्तकाची विक्री 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. पुस्तक खूप जुनं असल्याने अनेक ठिकाणी ते फाटलं होतं. त्यामुळंच या पुस्तकाची विक्री करण्याआधी काही दिवसांपूर्वी ग्रंथालयाने वाचकांना हे पुस्तक देण्यासही विरोध केला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, Bloomsbury ने या पुस्तकाच्या 500 प्रती 1997मध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यातील 300 प्रती युकेतील सर्व ग्रंथालयात  वाटण्यात आल्या होत्या. 11 लाख रुपयांत विक्री करण्यात आलेले हे पुस्तक Harry Potter Series मधील एक आहे. असं म्हणतात की, जेव्हा हे पुस्तक विक्रीसाठी मार्केटमध्ये आले तेव्हा त्याची किंमत मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती. अनेक हॅरी पॉटरचे फॅन (Rare first edition Harry Potter book) या पुस्तकाचे चाहते होते. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी हजारोंच्या उपस्थितीत चाहते पोहोचले होते. 

हॅरी पॉटर सीरीजमधील या पुस्तकाची सर्वाधिक बोली रिचर्ड विंटनर यांनी लावली होती. तब्बल 11.26 लाखांची किंमत लावून त्यांनी हे पुस्तक खरेदी केले आहे. त्यानंतर रिचर्ड विंटनर यांनी भावूक होत प्रतिक्रियाही दिली आहे. हे पुस्तक माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. कारण जे. के रोलिंगच्या ओरिजनल सीरीजचे हे पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक किती जणांनी वाचलं आहे हे त्यावर असलेल्या लायब्रेरीच्या स्टॅम्प आणि जुन्या स्टिकर्समुळं समजून येतेय. या पुस्तकासाठी 11 लाखांची रक्कम देणे हा तोट्याचील व्यवहार नसून माझ्यासाठी फायद्याचेच आहेत. हॅरी पॉटरची लोकप्रियता पाहूनच मी हे पुस्तक विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.