प्रिंंस हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल पुढील वर्षी अडकणार लग्नबंधनात

लंडनचा राजकुमार प्रिंस हॅरी आणि हॉलिवूडची अभिनेत्री मार्कल मेगेन पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार याची माहिती देण्यात आली आहे.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 28, 2017, 08:57 AM IST
प्रिंंस हॅरी आणि अभिनेत्री  मेगन मार्कल  पुढील वर्षी अडकणार लग्नबंधनात  title=
Kensington Palace‏ ट्विटर अकाऊंट

ब्रिटन : लंडनचा राजकुमार प्रिंस हॅरी आणि हॉलिवूडची अभिनेत्री मार्कल मेगेन पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार याची माहिती देण्यात आली आहे.  
सोमवारी लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि मार्कल मेगेन यांचा साखरपुडा झाल्याची माहिती ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.  

 

 

कोण आहे मार्कल मेगेन ? 

मार्कल मेगेन ही हॉलिवूडची अभिनेत्री आहे. लहानपणापासून मार्कल अमेरिकेमध्ये होती. इतर अभिनेत्रींप्रमाणेच मार्कलनेही या क्षेत्रामध्ये येण्यासाठी संघर्ष केला आहे. 

कॅथलिक मुलगी 

मार्कल मेगेन ही मिश्र वंशाची आहे. 1937  नंतर पहिल्यांदा अमेरिकन मुलगी ब्रिटनच्या राजघराण्यात प्रवेश करणार आहे. 

मित्रपरिवारात ओळख 

 
जुलै 2016 साली  प्रिंस हॅरी आणि मेगेनची ओळख कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली आहे. त्यानंतर पुढे त्यांच्यामधील भेटी गाठी वाढत गेल्या. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याची कबुली त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे.  गेली दीड वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. 

साखरपुड्याची खास रिंग  

मेगेनची साखरपुड्याची रिंगदेखील खास आहे. 3 हिर्‍यांची ही खास अंगठी प्रिंस हॅरीने खास बनवून घेतली आहे. या रिंगमधील एक हिरा स्वर्गीय  प्रिंसेस डायनाच्या ठेवीतील आहे. 

मेगेन मार्कल घटस्फोटीत  

मेगेनमार्कचं हे दुसरं आहे. २०११  ट्रेवर एंगलसन  सोबत मेगेन विवाहबद्ध झाली होती, मात्र दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.