मित्राची मस्करी करणं या व्यक्तीला पडलं महागात... खिडकीतून तोल गेला आणि...

या संदर्भात पोलीस दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मात्र, त्याने निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

Updated: Aug 19, 2021, 02:49 PM IST
मित्राची मस्करी करणं या व्यक्तीला पडलं महागात... खिडकीतून तोल गेला आणि... title=

मुंबई : मित्र म्हटलं की, मजा, मस्करी एकमेकांना घालून पाडून बोलणं हे सगळं येतंटच. आपण बऱ्यचदा आपण मित्रांसोबत अनेक प्रँक करतो, त्यांना घाबरवतो परंतु बऱ्याचदा अशा मस्करीची कुस्करी होते आणि त्याचे अतिशय भयानक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अशी एक घटना Russia च्या Kogalym येथे घडली आहे. येथे एक मित्राला घाबरवल्यामुळे तो 50 फूट खाली पडला आहे.

या व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो कोमात गेला आहे. या संदर्भात पोलीस दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मात्र, त्याने निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

एका मीडिया वृत्तानुसार, रशियातील कोगालीम येथे दोन व्यक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्टी करत असताना ही घटना घडली. पार्टी दरम्यान, 26 वर्षीय तरुण ताजी हवा घेण्यासाठी खिडकीजवळ उभा राहिला. त्यानंतर त्याचा 56 वर्षीय मित्राने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भितीने तोल जाऊन त्याचा मित्र थेट 50 फूट खाली पडला.

ढकलण्याचे नाटक महागात पडले

खरेतर या वृद्ध व्यक्तीने त्याच्या मित्राला घाबरवण्यासाठी त्याला ढकलण्याचे नाटक केले, परंतु बाल्कनीच्या खिडकीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचे संतुलन बिघडले. आणि तो खाली पडला, त्याने आधी बाल्कनीची रेलिंग पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही.

तो आधी खालच्या मजल्यावर बसवलेल्या एअर कंडिशनरवर धडकला आणि नंतर थेट जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, गंभीर जखमांमुळे माणूस कोमात गेला आहे आणि सध्या काहीही सांगणे शक्य नाही.

यासगळ्यावर 56 वर्षीय माणूसाने पोलिसांसमोर मान्य केलं की, त्याने त्याच्या मित्राला घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु असं करण्याचा त्यांचा कोणता हेतू नव्हता. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. फुटेजच्या आधारावर पोलिस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, हा प्रत्यक्षात अपघात होता की हत्या? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा दोन्ही मित्र दारूच्या नशेत होते.