डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या अफेरवर काय बोलली पॉर्न स्टार स्टॉर्मी

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठी टिपणी केली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 31, 2018, 10:41 PM IST
डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या अफेरवर काय बोलली पॉर्न स्टार स्टॉर्मी  title=

मुंबई : पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठी टिपणी केली आहे. 

आपलं यांच्याशी कोणतंही प्रेमसंबंध नसल्याचे सांगत या चर्चेला नाकारले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री आणि ट्रम्प यांच्यात 2006 मध्ये लैंगिक संबंध असल्याची चर्चा होती. ट्रम्प यांची 2006 मध्ये तिसरी आणि आताची पत्नी मेलानियासोबत लग्न झालं. स्टॉर्मीच्या वकिलने यावर विस्तृत माहिती दिली आहे.

स्टॉर्मी म्हणाली की,  याआधी 2006, 2011, 2016, 2017 साली सुध्दा माझ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी सुद्धा मी हे आरोप फेटाळून लावले होते आणि आता सुद्धा नाकारत आहे. 

मला तोंड बंद ठेवण्यासाठी भरपूर पैसे दिले म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध नाकारले असे परदेशी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. मूळातच असे काही घडलेले नाही त्यामुळे या आरोपात अजिबात तथ्य नाही असे स्टॉर्मीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.