श्रीलंकेमध्ये राजकीय संकट, राजकीय हिंसेची शक्यता

श्रीलंकेमध्ये राजकीय संकटाने विकृत रुप धारण केलं आहे.

Updated: Oct 30, 2018, 10:37 AM IST
श्रीलंकेमध्ये राजकीय संकट, राजकीय हिंसेची शक्यता title=

कोलंबो : श्रीलंकेमध्ये राजकीय संकटाने विकृत रुप धारण केलं आहे. रविवार पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू आणि पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या अंगरक्षकांनी नवे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर येथील परिस्थिती बिघडली.

श्रीलंकेतील संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी म्हटलं की, जर देशात नेतृत्व बदललं तर संघर्ष होऊ शकतो. यामध्ये राजकीय हिंसा देखील होऊ शकते. श्रीलंकेची राजधानी राजकीय षडयंत्रात सापडली आहे. जेव्हा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सीरीसेना यांनी म्हटलं की, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शुक्रवारी एका हत्येच्या आरोपाखाली पदावरुन हटवण्यात आलं. तर विक्रमसिंघे यांनी ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. सीरीसेना यांनी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनवलं आहे. राजपक्षे 2005 ते 2015 पर्यंत देशात सत्तेत होते. शनिवारी सीरीसेनाने सरकार बरखास्त केलं.

संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी म्हटलं की, 'आम्हाला संसगेच्या माध्यमातूनच यावर तोडगा काढावा लागेल. हा संघर्ष जर रस्त्यावर उतरला तर रक्त देखील वाहू शकतं. श्रीलंका पोलिसांचे प्रवक्ते रूवान गुरासेकरा यांनी म्हटलं की, पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या अंगरक्षकांनी राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी आहेत. सोमवार मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीलंकेमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. मागील वर्षी देशाचा आर्थिक विकास दर 2001 पेक्षा कमी होता. आंतरराष्ट्रीय दबाव देखील श्रीलंकेवर वाढला आहे. अमेरिकेने देखील लवकरात लवकर संसदेचं कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेतील विविधी देशांच्या राजदुतांनी यावर गंभीरपणे पाऊलं उचलण्याचा सल्ला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिला आहे.