मस्कत : तीन देशांच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान मोजी सध्या ओमानमधील मस्कतमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सुल्तान कबूस मशिदीला भेट दिली.
पीएम मोदी तीन आखाती देशांचा दौरा करुन आता पुन्हा भारतात येण्यासाठी निघाले आहेत. आआधी त्यांनी उपपंतप्रधान सैयद असद बिन अल-सैद आणि बिझनेस सीईओ यांची भेट घेतली.
ओमानच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना मशिदीची वैशिष्ट्य सांगितली. यानंतर मोदी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये मोदींनी UAE दौरा केला होता. या दरम्यान अबुधाबीच्या प्रसिद्ध शेख जायेद मशिदीला त्यांनी भेट दिली होती. पण पहिल्यांदाच मोदी मशिदीमध्ये गेले. त्यानंतर आता ते मस्कतचे सुलतान कबूस मशिदीमध्ये गेले.
Prime Minister Narendra Modi visited Sultan Qaboos Grand Mosque in Muscat #Oman pic.twitter.com/8EA99ZLjoA
— ANI (@ANI) February 12, 2018