Plane Crash Video: आपल्या आसपास रोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. काही घटनांचा आपल्याला अप्रत्यक्षरित्या फटका बसतो. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील मॅरीलँडमध्ये घडला. रविवारी रात्री एक छोटं विमान विजेच्या खांब्याला धडकलं. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. तसेच विमानातील दोन जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर वॉशिंगटनं पोस्टनं ही बातमी दिली आहे. यामुळे हजारो घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मॉन्टगोमरी काउंटी भागातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे.
मॉन्टगोमरी काउंटी पोलीस विभागाने ट्वीट करत लिहिलं आहे की, 'रोथबररी डॉ अँड गोशेन आरडी भागात एक छोटं विमान विजेच्या खांब्याला धडकलं . यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. @MCfrs घटनास्थळी आहे. या भागापासून दूर राहा कारण विजेचा तारा असल्याने करंट पास होत आहे.' फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टनुसार सिंगल इंजिन मूने M20J विमान रविवारी संध्याकाली 5 वाजून 40 मिनिटांनी विजेच्या खांब्याला धडकलं. तसेच खांब्याचं मधोमध अडकलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विमान विजेच्या खांब्यावर 100 फूट वर अडकल्याचं दिसत आहे.
Update / small Plane crash into power lines in Gaithersburg area, plane, 2 occupants on plane are OK, plane was headed towards (landing) Montgomery Airpark, Airpark is now closed to air traffic @MontgomeryCoMD https://t.co/VkITa378jC pic.twitter.com/UMYbeSJt9l
— Pete Piringer (@mcfrsPIO) November 28, 2022
बातमी वाचा- Video: दुर्लभ नारंगी कबूतराची सोशल मीडियावर चर्चा! 140 वर्षानंतर दिसल्यानं व्यक्त होतेय आश्चर्य
वॉशिंगटन पोस्टनुसार, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे विमान कमर्शियल भागात क्रॅश झालं, असा अंदाज आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.