लहान मुलांसाठीही येणार कोरोना लस? ट्रायल १०० टक्के यशस्वी

अमेरिकेतल्या फायझर लसीची लहान मुलांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता 

Updated: Mar 31, 2021, 10:12 PM IST
लहान मुलांसाठीही येणार कोरोना लस? ट्रायल १०० टक्के यशस्वी title=

मुंबई : अमेरिकेतल्या फायझर लसीची लहान मुलांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता १२ वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फायझरनं तिसऱ्या टप्प्यातली चाचणी घेतली. त्यात १२ ते १५ वर्षांमधील मुलांवर प्रयोग करण्यात आले. यात ही लस प्रभावी असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आता भारतातल्या लसींच्या चाचणीकडे लक्ष लागले आहे. 

आतापर्यंत भारतात कोविड योद्धे आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून भारतातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र लहान मुलांना लस कधी हा प्रश्न पालक वर्गाला सतावत होता. आता फायझर लसीला भारतातही मान्यता मिळाली, तर लहान मुलांनाही कोरोना लस देण्याचा मार्ग सुकर होईल. 

पीफायझर लसीच्या तिसऱ्या चाचणीत ही लस मुलांसाठी १०० टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अमेरिकेत झालेल्या या ट्रायलमध्ये २ हजार २६० मुलांचा समावेश होता.