स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Personality Test: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टची. त्यामुळे आपणही फारच उत्सुक असतो अशा काही कोड्यांमधून आपली पर्सनॅलिटी जाणून घेण्यासाठी. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 1, 2023, 08:57 PM IST
स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं title=
personality test what you see first know your personality from lady river bridge boat (Photo: The Mind Journal)

Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. फोटोंमधील चित्रांवरून आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं त्यावरून आपलं व्यक्तिमत्त्व कसं ओळखावं याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आपल्यालाही याबद्दल फारच उत्सुकता लागून राहिलेली असते. यावेळी सध्या असाच एक इंटरेस्टिंग फोटो हा सर्वत्र व्हायरल होतो आहे. नेहमीप्रमाणे यात तीन फोटो आहे तेही एकाच फोटोत. सोबतच तुम्हाला यात पहिल्यांदा काय दिसते यावर तुमचं व्यक्तिमत्त्वं कळू शकते. 

हा एक फक्त खेळ आहे. जो आपली उत्सुकता वाढवतो. त्यामुळे हा खेळ कसलाच दावा करत नाही. तेव्हा या लेखातून आपण हा खेळ खेळूया. सध्या या चित्र/ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तुम्हाला तीन गोष्टी सहज दिसतील. एक म्हणजे स्त्रीची प्रतिमा, नदी, एक पूल, आणि होडी. खरंतर नदीचा आकार पाहत या स्त्रीच्या कंबरचा, ड्रेसचा भाग हा रिबीनसारखा पुर्ण होतो आहे. तर पुल म्हणजे तिच्या ड्रेसचा ब्लेट. तर होडी तिचे हात आणि आजूबाजूचा परिसर. सध्या हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे या चार गोष्टींपैंकी तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत. 

हेही वाचा : न वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे

स्त्री : 'द माईंड जनरल'च्या नुसार जरा का तुम्हाला चित्रातून स्त्री दिसली तर तुम्ही तुमच्या बाह्य सौंदर्यांवर जास्त लक्ष देता. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्ही सुंदर गोष्टी पाहण्याकडे भर देता. याचा अर्थ तुम्ही जेव्हा दु:खी असता तेव्हा तुम्ही स्वत: कसे दिसता यावर जास्त भर देता.

नदी : जर का तुम्ही नदी पाहिलीत तर तुम्ही तुमच्या सोशल लाईफला घेऊन फारच गंभीर असता. दुसरे लोकं तुमच्याकडे कसे पाहता याकडे तुम्ही जास्त लक्ष देता. तुम्ही तुमच्या इमेजला घेऊन फारच संवेदनशील आहेत. 

पूल : जर तुम्ही पूल पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की सहानुभूती दुसऱ्यांना देऊ शकत नाही. तुम्हाला इतरांच्या दु:खांशी काहीच घेणे देणे नसते. 

होडी : जर तुम्ही पहिल्यांदा होडी पाहिलीत तर तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा जास्त वेगळे समजता. त्यातून इतरांच्या सल्लांना तुम्ही फारसे महत्त्व देत नाहीत.