"ते दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आले," लाखो लोकांनी पाहिला महिलेचा 'हा' व्हिडीओ

सितारा यासीन पाकिस्तानच्या प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांच्या पतीने दोन लग्नं केली आहेत.  युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. पतीच्या दुसऱ्या पत्नीमुळे आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्या सांगत असतात. आपण आपल्या पतीची पहिली पत्नी असल्याचं त्या सांगतात.  

Updated: Jan 26, 2023, 12:40 PM IST
"ते दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आले," लाखो लोकांनी पाहिला महिलेचा 'हा' व्हिडीओ title=

सितारा यासीन पाकिस्तानच्या प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांनी आपल्या चॅनेलवर स्वत:च्या आयुष्याबद्दल काही भावूक किस्से शेअर केले आहेत. सितारा यांच्या पतीने दोन लग्नं केली आहेत. त्यांनी आपल्या अनेक व्हिडीओंमध्ये पतीच्या दुसऱ्या पत्नीचा उल्लेख केला आहे. एका व्हिडीओत त्यांनी आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नावरुन लोक जे बोलतात त्याचा उल्लेख केला आहे. तुझा पती फक्त तुझाच नाही असा टोमणा लोक मारत असल्याचा उल्लेखही तिने त्यात केला आहे. या व्हिडीओत सितारा फारच भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. 

युट्यूबवर लाखो सबस्क्रायबर्स

सितारा यांच्या व्हिडीओला लाखो लाईक असतात. सितारा यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये त्यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. एका व्हिडीओत त्या सांगत आहेत की, आपले पती दुसऱ्या पत्नीला राहण्यासाठी घरी घेऊन येतात. यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपण एकत्र राहण्यासाठी फार प्रयत्न केले, पण हे फार कठीण आहे असंही त्यांनी कबूल केलं आहे. 

सितारा यांनी आपल्याच युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत सगळा प्रकार सांगितला आहे. युट्यूबवर त्यांचे आठ लाख सबस्क्रायबर्स आहेत. आपण आपल्या पतीची पहिली पत्नी आहोत. मात्र ते अनेकदा तिच्यासोबत राहण्यासाठी जातात असं त्या व्हिडीओत सांगत आहेत. 

पतीच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहण्याची इच्छा का नाही याबद्दलही त्यांनी व्हिडीओत सांगितलं आहे. सितारा यांचे इन्स्टाग्रामवरही एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिथे त्या आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. युट्यूबवर त्यांनी आपलं लग्न ठरल्यापासून ते लग्नापर्यंतचे व्लॉग पोस्ट केले आहेत. इतर व्हिडीओंमध्ये सितारा पतीच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात नांदताना दिसत असते.