कराची : लाच स्विकारण्याच्या अनेक पद्धती आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतील. काही ठिकाणी गडगंज पैशाची मागणी करण्यात येते, तर काही ठिकाणी महागड्या भेटवस्तू स्विकारल्याच्या घटना आपण ऐकल्या वाचल्या असतील. मात्र या देशात काही विपरीतचं घडते आहे. देशात लाच स्वरूपात गायी बकऱ्यांना स्विकारले जात आहे. त्यामुळे नेमका असा का प्रकार सुरु आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.त्यामुळे अशी लाच का स्विकारली जात आहे त्याची माहिती घेऊयात.
पाकिस्तानच्या कराचीतील एका व्यक्तीच्या घरात गोळीबार झाला होता. या गोळीबार प्रकरणी एका व्यक्तीने कराचीतील फिरोजाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार व्यक्तीकडून लाच मागितली होती.
ARY न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीतील फिरोजाबाद पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका व्यक्तीकडून लाच मागितली. या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर लाच म्हणून दोन शेळ्या आणि एक गाय द्यावी लागेल, असे त्याने तक्रारदाराला सांगितले.
का मागितली जातेय गायी-बकऱ्यांची लाच?
पाकिस्तानची अवस्था श्रीलंका आणि घानासारखी झाली आहे. आर्थिकसह अनेक समस्यांना नागरीकांना सामना करावा लागतोय. पाकिस्तानमध्ये रुपया सातत्याने नीचांकी पातळीवर जात आहे. अन्न आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेला पाकिस्तान सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पोलीस गायी-बकरींची लाच मागत आहे.