पाकिस्तानला छप्पर फाडके आर्थिक मदत, सौदी अरेबिया देणार 7,09,15,00,00,000 रुपये

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान पहिल्यांदा पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर जात आहे. त्याआधी त्यांनी छप्पर फाडके पाकिस्तानवर पैशांची उधळण केली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 12, 2019, 06:34 PM IST
पाकिस्तानला छप्पर फाडके आर्थिक मदत, सौदी अरेबिया देणार 7,09,15,00,00,000 रुपये title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचा आर्थिक डोलारा पूर्णत: कोलमडला आहे. मात्र, त्यांच्यासाठी सौदी अरेबियाचे प्रिन्स धावून आले आहेत. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान पहिल्यांदा पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर जात आहे. त्याआधी त्यांनी छप्पर फाडके पाकिस्तानवर पैशांची उधळण केली आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा खजाना ठरला आहे. ही पाकिस्तानसाठी चांगली आणि मोठी बातमी आहे. या मदतीमुळे पाकिस्तानची आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. सौदी अरेबियाने 10 बिलियन डॉलर पेक्षा अधिक रक्कम देऊ केली आहे. 7,09,15,00,00,000 रुपयांची ही मदत आहे.

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावर प्रिन्स सलमान 16 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. पिन्स सलमान हे पाकिस्तानचे पहिले पाहुणे आहेत. या दौऱ्यात ते दोन देशांमधील मोठ्या तीन प्रमुख करारांवर स्वाक्षरी करतील. ही माहिती संचालक मंडळाचे अध्यक्ष (बीओआय) हारून शरीफ यांनी दिली. हे करार तेल शुद्धीकरण, लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आणि खनिज विकासक क्षेत्रात असेल. या कराराच्या माध्यमातून पाकिस्तानला ही छप्पर फाडके रक्कम मिळणार आहे.

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान (फाइल फोटो)

या करार व्यतिरिक्त, पाकिस्तानसोबत व्यापाराबाबत अनेक करार होणार आहेत. सौदीमधील 40 टॉप उद्योगतीसोबत प्रिन्स पाकिस्तानला भेट देत आहेत. सौदी अरेबिया दरम्यान अनेक व्यापार करार समावेश असू शकतो. हे प्रतिनिधी स्थानिक व्यावसायिकांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा करतील. या भेटीदरम्यान काही खासगी पातळीवरील करारदेखील असतील. तेल रिफायनरीबाबत 8 बिलियन डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीव्यतिरिक्त स्थानिक लोक रोजगाराच्या संधी देखील प्रदान करतील. तसेच सौदी रिफायनरीसह पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अबरो डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक होईल.

सौदी सरकार ग्वादरमध्ये एक तेल शुद्धीकरणाचा कारखाना उभारण्यासाठी उत्सुक आहे. या व्यवहाराबाबत तसा अहवाल तयार करण्यासाठी सरकारला सांगितले. सौदी अरेबियाच्या ग्वादरमधील गुंतवणुकीला चीनने आक्षेप घेतलेला नाही. ज्या भागात सौदी अरेबिया तेल रिफायनरी स्थापन करणार आहे, त्याबाबत अभ्यासनंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) पासून बरेच दूर असेल, असे सांगण्यात येत आहे.