IND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण...

Imran Khan News: 2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे. 

Updated: Jun 21, 2023, 08:48 PM IST
IND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण... title=
Imran Khan, Pakistan Army Kashmir

Imran Khan On India: स्वातंत्र्यापासून दोन विभक्त झालेले देश भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. अनेक मुद्द्यांवरून या दोन्ही देशात धडपकड सुरू असते. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कश्मिर (Kashmir). जमिनीवर स्वर्ग अशी ओळख असेला कश्मिर गेल्या दोन दशकापासून दहशतवादाच्या पिंजऱ्यात अडकलाय. दोन्ही देश काश्मीरबाबत आपली प्रखर भूमिका मांडतात. दोन्ही देशांनी सलोख्याने मुद्दा हाताळावा, अशी मागणी इतर देशांनी केली आहे. अशातच आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी मोठा खुलासा केला आहे.

इमरान खान (Pakistan Ex PM Imran Khan) यांनी अटलांटिक कौन्सिलला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तानसंदर्भात काही गोष्टींचा खुलासा केला. पाकिस्तान भारतासोबत शांतता प्रस्तावावर काम करत आहे. 2019 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्याची योजनाही इस्लामाबादने आखली होती, असं इमरान खान यांनी म्हटलंय. त्यावेळी त्यांनी कश्मिरबाबतच्या पाकिस्तानच्या छुप्या भूमिकेचा मोठा खुलासा केला.

2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला, असंही इमरान खान म्हणाले आहेत. मात्र, लष्कराने (Pakistan Army) भारत सरकारला पाठिंबा देणं बंद केल्यानंतर इमरान खान यांचे बाजवा यांच्याशी संबंध बिघडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बाजवा यांनी मला वारंवार सांगितलं होतं की, पाकिस्तानी सैन्य भारतासोबत युद्धासाठी सज्ज किंवा तयार नाही, असंही माजी पंतप्रधान म्हणालेत.

आणखी वाचा - पंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश

दरम्यान, संसदीय विश्वासदर्शक ठरावामध्ये इमरान खान यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कश्मिर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होणार होती, त्याचा रोडमॅपही तयार झाला होता, असंही इमरान खान यांनी म्हटलं आहे. इमरान खानच्या या वक्तव्यानंतर अद्याप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलं नाही.