Pregnancy Makeup: प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिलेने प्रसूतीआधी (Pregnancy) संपूर्ण चेहऱ्याला मेकअप (Makeup) केला. लिपस्टिक, आयलॅशेस, मस्कारा असं सर्वकाही तीने केलं आणि त्यानंतर त्या महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर आपल्या नवजात बाळाला घेऊन महिलेने फोटोशूटही केलं. या महिलेचे आणि तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांना जेव्हा तिच्या मेकअपचं कारण कळलं तेव्हा त्यांनीही कपाळावर हात मारुन घेतला.
या महिलेचं नाव टीना एरागॉन असं असून ती 24 वर्षांची आहे. अमेरिकेतल्या कोलोरोडो इथं ती राहाते. एरागॉनला एक मुलगी आहे आणि दुसऱ्यांदा ती गरोदर होती. प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर एरगॉनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण प्रसूतीआधी एरागॉनने संपूर्ण चेहऱ्याला मेकअप केला. प्रसूतीनंतर जेव्हा बाळासाोबत फोटो काढले जातील त्यात चेहऱ्यावर ग्लो दिसावा तसंच फोटो ग्लॅमरस यावेत म्हणून एरागॉनने हा सर्व खटाटोप केला.
दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर एरागॉनने ठरल्याप्रमाणे नवजात बाळासोबत फोटोशूट केलं. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत एरागॉन रुग्णालयातील बेडवर दिसत असून तिच्या हातात नवजात बाळ आहे. या फोटोत ती पूर्ण मेकअपमध्ये दिसत आहे. आयब्रोपासून लिपस्टिकपर्यंत सर्व मेकअप तीने केला आहे.
प्रसूतीच्यावेळी तिचा पती रुग्णालयातच उपस्थित होता. त्यानेचे हे फोटो काढले आहेत. आपल्या पत्नीची मेकअप करण्याची इच्छा होती, कारण प्रसूतीनंतर फोटोशूट करताना ग्लॅमरस दिसावं असं तिला वाटत होतं. त्यामुळे आपणही तिच्या इच्छेला विरोध केला नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. एरागॉनला पाहिल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले होते. डॉक्टरांनी तिला असं न करण्याचं आवाहनही केलं होतं. पण याकडे तिने लक्ष दिलं नाही. तिच्या मते प्रसूतीवेळी वेदना विसरण्यासाठी मेकअप करणं ही चांगली कल्पना होती. यामुळे वेदना कमी जाणवत होत्या.
टीना एरागॉनही व्यवसायाने त्वचा रोग तज्ज्ञ (Cosmetologist) आहे. कॉस्मेटोलॉजिस्ट वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनं आणि थेरपीद्वारे चेहरा, केस आणि संपूर्ण शरीराला आकर्षक बनवण्याचं काम करतात. पण एरागॉन स्वत:वरही मेकअपचे प्रयोग करत असते, अशी माहिती तिच्या पतीने दिलीय. एरागॉनने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय आणि सध्या सोशल मीडियावर तीचे आणि तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी तिच्या या कृतीला वेडेपणा म्हटलं आहे, तर काही जणांनी कौतुक केलं आहे.