Most Dangerous Terrorist: सर्वात धोकादायक दहशतवादी म्हणून ओळख असलेल्या ओसामा बिन लादेनच्या कुरापतींमुळे झालेलं नुकसान आजही संपूर्ण जगाला माहिती आहे. आमेरिकेने खात्मा केलेल्या दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या मुलाने धक्कादायक दावा केला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा ओमर (Omar bin Laden) याने केलेल्या दाव्या प्रमाणे ओसामा बिन लादेनने मुलाने आपल्या पाऊलावर पाऊल टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढंच नाही तर रसायनांचा वापर कुत्र्यांवर केल्याचा खुलासा ओसामा बिन लादेनचा मुलगा ओमर याने केला आहे. (osama bin laden documentary)
'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत ओमरने वडील ओसामा बिन लादेनबद्दल अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. वडिलांनी केलेल्या कृत्याला मी आजही विसरू शकत नाही... असं देखील ओमर म्हणाला आहे. कुत्र्यांवर केलेल्या रसायनांच्या वापराबद्दल ओमर म्हणाला, 'लादेनच्या गुंडांनी रसायनांचा वापर माझ्या कुत्र्यांवर केला, ज्यामुळे मी बिलकूल आनंदी नव्हतो..' (Osama Bin Laden Son Omar bin Laden)
पुढे ओमर म्हणाला, 'वडिलांनी माझ्यासोबत केलेल्या गोष्टी मी विसरण्याचा आजही प्रयत्न करत आहे. पण इतक्या वर्षांनंतर देखील त्या कटू आठवणी मला विसरता येत नाहीत.' ओसामा बिन लादेनचं काम ओमरने पुढे चालवण्याची त्याची इच्छा होती. पण लादेनची इच्छा पूर्ण होवू शकली नाही.
ओमरने न्यूयॉर्कमधील 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी एप्रिल 2001 मध्ये अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. आज ओमर 41 वर्षांचा आहे. ओमर सध्या फ्रान्समध्ये चित्रकार म्हणून काम करत असून पत्नीसोबत राहत आहे. (who was osama bin laden)
ओमर हा ओसामा बिन लादेनची पहिली पत्नी नजवाचा मुलगा आहे. ओमरचा जन्म 1981 साली झाला होता. आपल्या क्षेत्राविषयी ओमर म्हणतो, 'कला ही एक थेरपी आहे. अफगानिस्तान सोडल्यानंतर माझा आवडता विषय 'डोंगर' आहे.' महत्त्वाचं म्हणजे ओमर त्याच्या चित्रांमधून लाखो रुपयांची कमाई करतो.
ओमर म्हणतो, 'वडिलांनी मला कधी अलकायदामध्ये सहभागी होण्यास सांगितलं नाही. पण त्यांचं काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. जेव्हा मी त्यांना सांगितलं हे जीवन माझ्यासाठी नाही.. तेव्हा ते प्रचंड निराश झाले.' (osama bin laden truth)
पुढे ओमरला विचारण्यात आलं ओसामा बिन लादेनने तुझीच निवड का केली? यावर ओमर म्हणाला, 'या गोष्टी कारण मला माहित नाही. कदाचित मी हुशार होतो आणि म्हणून मी आज जिवंत आहे... ' (osama bin laden movie)