मुंबई : 'ऑप्टिकल इल्युजन' हा एक प्रकारचा भ्रम आहे, जो खास तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी आहे. अशा चित्रांमुळे तुमच्या मेंदूचा व्यायाम तर होतोच, पण गोष्टी समजून घेण्याचा दृष्टीकोनही सुधारतो. यासोबतच तुमची IQ पातळी वाढवण्यासही मदत होते. अनेकांना कोडी सोडवण्यात मजा येते. जर तुम्हीही त्यांच्यापैकी असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत.
आजच्या या टेस्टमध्ये अनेक मानवी चेहऱ्यांमध्ये एक डुक्कर देखील लपलेला आहे. आव्हान हे आहे की तुम्हाला ते शोधावं लागेल आणि ते 10 सेकंदात सांगावं लागेल. तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत ते पाहूया.
तुम्ही पाहू शकता की कलाकाराने चित्रात अनेक चेहरे अशा प्रकारे दर्शवले आहेत की, त्यांच्यामध्ये डुक्कर देखील लपलेलं आहे हे समजणार नाही. दोघांचा रंग जवळपास सारखाच असल्याने डुक्कर शोधणं सोपं नाही. पण तरीही तुमची दृष्टी किती तीक्ष्ण आहे आणि तुम्ही दिलेल्या वेळेत डुक्कर शोधू शकता की नाही ते पाहू या.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक मानवी चेहरे एकाच प्रकारचे टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. काही आनंदी तर काही उदास दिसतात. कोणी चष्मा घातला असेल तर कोणाच्या डोक्यावर टोपी दिसते. काहींनी तर मफलरही घातलं आहेत. पण, या मानवी चेहऱ्यांमध्ये कलाकाराने चतुराईने डुक्करही लपवलं आहे. कारण, मानवी चेहरे आणि डुकरांमध्ये इतकं साम्य आहे की अनेक प्रयत्नांनंतरही ते कोणालाच दिसत नाहीत.
जर तुम्हाला अजूनही डुक्कर दिसलं नसेल, तर ते शोधण्यात आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. फोटो काळजीपूर्वक पहा. तुम्हाला ते डुक्कर वरून पाचव्या ओळीत दिसेल. आणि तरीही सापडला नाही, तर खाली लाल वर्तुळात आम्ही तुम्हाला ते कुठे लपलंय ते दाखवलं आहे.