समुद्रात विमान कोसळलं, 189 प्रवाशांपैकी फक्त हा एकच प्रवासी यामुळे वाचला

13 मिनिटातच विमान क्रॅश

Updated: Oct 30, 2018, 12:01 PM IST
समुद्रात विमान कोसळलं, 189 प्रवाशांपैकी फक्त हा एकच प्रवासी यामुळे वाचला title=

नवी दिल्ली : इंडोनेशियाचं लॉयन एअरलाइन्सचं विमान सोमवारी गायब झालं. हे विमान समुद्रात कोसल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. विमानातील 189 प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. जकार्ता येथून उडालेलं विमान 13 मिनिटातच क्रॅश झालं. पण असं म्हणतात ना जाको राखे साइयां मार सके ना कोई असंच काही एका व्यक्ती सोबत घडलं आहे.

बोईंगमध्ये इंडोनेशिया फायनान्स मिनिस्ट्रीचे जवळपास 20 कर्मचारी होते. ज्यामध्ये सोनी सेतियावान हा कर्मचारी देखील या विमानातून प्रवास करणार होता. त्याने म्हटलं की, मला माहित आहे की माझे मित्र या विमानातून प्रवास करत होते. विमानतळावर उशिरा पोहोचल्याने सेतियावानने दुसऱ्या विमानाने प्रवास केला. ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.

इंडोनेशियाचं हे विमान जेटी-610 जकार्ता येथून पंगकल पिनॉन्गला जात होतं. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 13 मिनिटातच त्याचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी विमान परत आणत असल्याची माहिती पायलटने दिली होती.

सेतियावान नेहमी या विमानाने प्रवास करायचे. पण सोमवारी ट्रॅफिकमुळे त्याला विमानतळावर वेळेवर पोहोचता आलं नाही. लॉयन एअरचं हे विमान 10 मिनिटात पंगकल पिनॉन्गला पोहोचणार होतं पण ते आलंच नाही.