काही प्राणी पिल्लांचा जन्म होताच मारून टाकतात, कारण जाणून थक्क व्हाल

जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सस्तन प्राणी आपल्या पिल्लांना मारतात ही सामान्य बाब आहे

Updated: Jun 27, 2021, 03:13 PM IST
काही प्राणी पिल्लांचा जन्म होताच मारून टाकतात, कारण जाणून थक्क व्हाल title=

मुंबई : जगातील कुठलेही प्राणी असो, ते आपल्या पिल्लांवर जीवापाड प्रेम करतात. परंतु जगात असे सुद्धा काही प्राणी आहेत, जे आपल्या पिल्लांचा जन्म होताच मारून टाकतात. तुम्हाला हे वाचून धक्का बसलाय ना? परंतु हे अगदी खरे आहे, की काही प्राणी जन्मताच आपल्या पिल्लांना ठार मारतात.

जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सस्तन प्राणी आपल्या पिल्लांना मारतात ही सामान्य बाब आहे. जीवशास्त्रज्ञांनी 289 सस्तन प्राण्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये जवळजवळ एक तृतीयांश प्रजातीमध्ये पिल्लांची हत्या करण्याचे पुरावे सापडले आहे. बऱ्याचदा अनेक प्राणी आपल्या समूहांमधील कमी वयाच्या प्राण्यांना मारून टाकतात. अनेकवेळा समूहातील मादी दुसऱ्या मादींच्या पिल्लांनाही ठार मारतात.

मानवीशास्त्रज्ञ हार्डी यांनी वानरांच्या हत्येवर एक अहवाल सादर केला होता. वानर ही माकडांचीच एक प्रजाती आहे. जी जगभर पसरली आहे. परंतु प्राण्यांमधील हत्येविषयी चर्चा होत नाही. हार्डी यांनी 1970 मध्ये हा अहवाल सादत केला होता. त्यानंतर अनेक वादविवाद झालेत. अहवालात दक्षिण अमेरिकेतील झाडांवर राहणाऱ्या आफ्रिकी माकडांचे उदाहरण दिले गेले होते.

हार्डी यांच्या अहवालात लिहिले की, जेव्हा मादी मार्मोसेट गर्भवती असते आणि आपल्या पिल्लांना जन्म देण्यास तयार होते, परंतु ती त्याच काळात पिल्लांना ठार मारण्यास प्रवृत्त होत असते.

2007 च्या अहवालानुसार महिनाभरातील मार्मोसेटच्या हत्येची बाब समोर आली होती. एका समूहातील प्रमुख मादी दुसऱ्या मादी मार्मोसेटच्या पिल्लांना ठार मारते. असे या अहवालातून समोर आले होते.

मादीने दुसरी मादीच्या पिल्लांना मारले होते. त्यानंतर तिने दोन जुळ्या पिल्लांना जन्म दिला होता आणि समूहाची प्रमुख बनली होती. आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी तिने दुसऱ्या मादीच्या पिल्लांना ठार केले होते. 

कँब्रिज विद्यापीठाच्या डायटर लुकास यांच्यासोबत हाचर्ड यांनी नुकताच सस्तन प्राण्यांच्या हत्येबाबत एक अहवाल बनवला होता. यामध्ये 289 प्रजातीपैंकी 30 टक्के हत्या झाल्याची नोंद झाली होती.