Nobel Prize 2023: जगभरात सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कोरोनावर महामारीवर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हंगेरीचे कॅटलीन कराकी (Katalin Karikó) आणि अमेरिका ड्र्यू वीसमन ( Drew Weissman) या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
2020 मध्ये संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी अथक संशोधन करत होते. यावेळी कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी यांचे संशोधन संपूर्ण जगभरातील संशोधकांसाठी दिशादर्शक असे ठरले.
कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांच्या संशोधनामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच कोविड 19 (COVID-19) विरुद्ध प्रभावी लस विकसित करण्यात मदत झाली. कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी mRNA वर संशोधन केले. mRNA म्हणजे RNA चा कोडवर्ड आहे. एखादा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरावर हल्ला करतात तेव्हा mRNA तंत्रज्ञान आपल्या पेशींना त्या विषाणू किंवा बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यास मदत करतात. 2020 मध्ये कोरोना लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले केले. यावेळी कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी विकसीत केलेल्या mRNA तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. या mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीनेच बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कोरोना लस विकसीत केली. ही लस प्रभावी ठरली आणि कोराना महामारीवर मात करण्यास मदत झाली.
कॅटलीन कराकी या कैटिलिन कैरिको यांचा जन्म 1955 मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला होता. 1982 मध्ये जेगेड विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी केली. त्यानंतर फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 2013 नंतर कॅटलिन कैरिको यांची बायोएनटेक RNA या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड झाली.
ड्र्यू वीसमन यांचा जन्म 1959 मध्ये अमेरिकेच्या मॅसाच्यूसेटसमध्ये झाला. 1987 मध्ये त्यांचे पीएच.डी आणि एमडी पदवी शिक्षण पूर्ण झाले. यानंतर ते हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये कार्यरत होते. 1997 मध्ये त्यांनी स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु केला. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.