पाकचे नाव ऐकून भारतातील लोक...; पाकिस्तानात गेलेल्या अंजूची भाषाच बदलली

Anju Nasrullah News: अंजू आणि नसरुल्ल्हा यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. पाकमध्ये गेलेल्या अंजूने आता भारताबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 4, 2023, 09:48 AM IST
पाकचे नाव ऐकून भारतातील लोक...; पाकिस्तानात गेलेल्या अंजूची भाषाच बदलली title=
No Idea Why The People Of India Get Scared With Pakistan says anju

Anju Nasrullah News: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने पाकबाबत केलेल्या एखा वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजस्थानमधून पकिस्तानी प्रियकराला भेटण्यासाठी अंजूची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे. नसरुल्लाहसोबत अंजूने निकाह केला आहे. तसंच, तिचे नावही फातिमा असं करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. अलीकडेच अंजूने पाकिस्तानी न्यूज चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रेमकहाणीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. त्याचबरोबर, पाकिस्तान आणि भारताबाबतही भरभरुन बोलली आहे.

अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केल्यानंतर ती अद्यापही पाकिस्तानातच आहे. तर, भारतात तिचा पती आणि मुलं आहेत. लवकरच ती भारतातून मुलांना घेऊन जाईल, असं तिने म्हटलं आहे. मला मुलांची फार आठवण येते आणि मी लवकरच त्यांचा ताबा मिळवणार आहे, असं अंजूने म्हटलं आहे. त्याचबरोबर, भारतातील लोक पाकिस्तानचे नाव ऐकून घाबरतात पण मला तर हे नाव ऐकून खूप आनंद होतोय.

मुलांचा ताबा मिळवणार

अंजूने पुढे मुलाखतीत म्हटलं आहे की, आम्ही आधी खूप चांगले मित्र होतो. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. त्यानंतर आम्ही एकदा भेटण्याचा प्लान बनवला होता. नसरुल्लाह यांनी पाकमध्ये राहून तयारी केली तर मी भारतातून इथे येण्यासाठी प्रयत्न करत होते. मला इथे आल्यानंतर मुलांची खूप आठवण येतेय आणि मी लवकरच त्यांचा ताबा मिळवेन, असं अंजूने म्हटलं आहे. 

पाकिस्तानाबद्दल दहशत का वाटते...?

भारतातील मीडियाबाबत तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता तिने स्पष्ट उत्तर दिले आहे. भारतातील मीडिया माझ्याबद्दल काय बोलते याकडे मी लक्ष देत नाही. ते माझ्याबद्दल जास्तकरुन अफवा पसरवत आहेत त्यातील फक्त 1 टक्के गोष्टीच खऱ्या आहेत, असं अंजूने म्हटलं आहे. पुढे बोलताना ती म्हणाली की, जेव्हा नसरुल्लाहने सांगितलं की तो पाकिस्तानात राहतो हे ऐकूनच मला खूप आनंद झाला होता. मीदेखील भारतात राहत होते. माहित नाही का भारतातील लोकांमध्ये पाकिस्तानाविषयी दहशत आहे. मला तर पाकिस्तानचे नाव ऐकून अजिबात भीती वाटत नाही मला इथे येऊन खूप छान वाटतंय, असं अंजूने म्हटलं आहे.