New Zealand Earthquake: तुर्की, सीरिया आणि इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे (Earthquake) तिन्ही देशांमध्ये मिळून 7,800 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. 15,000 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता न्यूझीलंडमध्ये (New Zealand) मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल (Seismic magnitude scales) इतकी नोंदवण्यात आली आहे. (New Zealand Strong earthquake of magnitude 6.1 hits north west of Wellington)
न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार (Earthquake in New Zealand) संध्याकाळी सातच्या सुमारास भूकंप झाला असून त्यानंतर सलग 30 सेकंदांपर्यंत भूकंपचे धक्के बसत होते. भूकंपाचं केंद्र हे जमिनीपासून 48 किमी खोल असल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी वेलिंग्टनसह (Wellington) देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu
— ANI (@ANI) February 15, 2023
तात्काळ दखल घेऊन भूकंपग्रस्त क्षेत्रांमध्ये मदत आणि बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात न्यूझीलंडच्या समुद्रकिनाऱ्याला चक्रिवादळाचा (Cyclone) तडाका बसला आहे. त्यामुळे तब्बल 11 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. तर अनेकांना आपलं घर देखील सोडावं लागलंय.
दरम्यान, तुर्कीमध्ये (New Zealand earthquake) काही दिवसांपूर्वी भूकंपाचे जोरादार पाच धक्के जाणवले. तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे आत्तापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला होता.