Ryan Grantham : हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम याला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध रिवरडेल या शोमध्ये काम करणाऱ्या रायन ग्रँथमने स्वत:च्या आईचा खून केला, असा आरोप करण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी त्याला न्यायालयाने दोषी मानलं होतं. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. (Netflix fame actor Ryan Grantham sentenced to life imprisonment for 14 years)
कोर्टाच्या आदेशानुसार, रायन आपल्या उर्वरित आयुष्यात कधीच बंदुकीचा वापर करू शकणार नाही. बंदुक वापर करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यातबरोबर त्याची पेरोलवर देखील सुटका होऊ शकणार नाही.
रायनला जन्मठेपेची शिक्षा-
कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने रायन ग्रँथमला शिक्षा सुनावली. मार्च 2020 साली रायने स्वत:च्या 64 वर्षीय आईची गोळी मारून हत्या केली होती. त्याची आई पियानो वाजवत असताना रायनने गोळी मारली. त्यावेळी त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला.
सीबीसीच्या रिपोर्टनुसार, न्यायमुर्ती कैथलीन कैरने हा निकाल सुनावताना घटनेवर दु:ख व्यक्त केलं. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.