Ukraine Russia युद्धात NATO ची एन्ट्री, 30 देशांच्या रिस्पॉन्स फोर्सला केलं अॅक्टिव्ह

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 3 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकं मारले गेले आहेत. या युद्धात आता NATO ची एन्ट्री झालीये

Updated: Feb 26, 2022, 07:24 PM IST
Ukraine Russia युद्धात NATO ची एन्ट्री, 30 देशांच्या रिस्पॉन्स फोर्सला केलं अॅक्टिव्ह title=

Ukraine Russia war : युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाल्याची बातमी आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात म्हटले आहे की, येत्या काही तासांत रशिया युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ शकते. 

युरोपियन युनियन आणि अमेरिकेने रशियावर दीर्घकालीन निर्बंध लादण्याचं वक्तव्य केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते, असा दावा लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एस्सेलबॉर्न यांनी केला आहे. 27 देशांचे युरोपियन युनियन या संदर्भात लवकरच सहमती दर्शवू शकते. 

रशिया आणि युक्रेनच्या या युद्धात आता NATO ची एन्ट्री झाली आहे. NATO ने आतापर्यंत 30 देशांच्या रिस्पॉन्स फोर्स टीमला अॅक्टिव केलं आहे.

नाटो रिस्पांस फोर्स (एनआरएफ) अनेक मिलिट्री ब्रांच एकत्र करुन बनलेले एक इमिडिएट आणि अर्जेंट टॉस्क फोर्स आहे. नाटो रिस्पांस फोर्सची सुरुवात 2002 मध्ये प्राग शिखर परिषदेने केली होती. त्याच्या एक वर्षानंतर जून 2003 मध्ये सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी ब्रासेल्समध्ये एनआरएफच्या कन्सेप्टला मंजूरी दिली होती. 

तत्कालीन नाटो सुप्रीम एलाइड कमांडर यूरोप (SACEUR) चे जनरल जेम्स जोन्स यांनी म्हटलं होतं की, स्वत:च्या रक्षणासाठी आणि मित्रांच्या मदतीसाठी प्रत्येक मिशनला यशस्वी करण्यासाठी हे सैनिक असतील. 21 व्या शतकातील कोणत्यांनी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी हे सैन्य तयार असेल.

नाटोमधील राष्ट्रांनी 2014 च्या वेल्स शिखर संमेलनात एनआरएफला अधिक ताकदवान बनवण्यासाठी प्रस्ताव आणला. नाटो रेस्पाँस फोर्सच्या आधी द वेरी हाय रेडीनेस ज्वाइंट टास्क फोर्स (वीजेटीएफ) मध्ये जवळपास 20 हजार सैनिक असतात. ज्यामध्ये तिन्ही दलातील सैन्यांचा समावेश केला जातो.