ब्रम्हांडात ताशी 1000000 KM एवढ्या अति वेगाने फिरतेय रहस्यमय गोष्ट, संशोधनात NASA तील शास्त्रज्ञही हैराण

Mysterious Object In Universe: NASA च्या प्रोजेक्टवर काम करत असलेल्या संशोधकांना एक रहस्यमय गोष्ट दिसली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट 1609344 किमी प्रती तासाने आकाशगंगेच्या बाहेर जाताना दिसत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 21, 2024, 03:26 PM IST
ब्रम्हांडात ताशी 1000000 KM एवढ्या अति वेगाने फिरतेय रहस्यमय गोष्ट, संशोधनात NASA तील शास्त्रज्ञही हैराण  title=

Science News : अवकाशात ताशी दहा लाख किमी इतक्या वेगानं एखादी गोष्ट वावरत असेल तर नेमकं काय चित्र असेल? अवकाशातील या हालचालींमुळे कोणताही तारा आकाशगंगेबाहेर फेकला जाऊ शकतो. सिटीझन सायंटिस्टनं यासंदर्भातील संशोधन करत त्याविषयीचा एक अहवाल सादर केला आहे. प्राथमिक स्वरुपात हे एक रहस्यमयी पिंड असून, तो बटू तारा असल्याचं सांगितलं जात आहे. हे पिंड सध्या अतिप्रचंड वेगानं अवकाशात वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कसा शोधला हा तारा 

नासाच्या बॅकयार्ड वर्ल्ड्स प्लॅनेट 9 प्रकल्पावर काम करत असताना टीमने हा शोध लावला. यामध्ये नासाच्या WISE (Wide-field Infrared Explorer) मोहिमेतील फोटो वापरण्यात आली आहेत. 2009 ते 2011 दरम्यान चाललेल्या मिशनमध्ये, आकाश इन्फ्रारेड प्रकाशात मॅप केले गेले. जेव्हापासून नासाचे शास्त्रज्ञ सामील झाले आहेत, तेव्हापासून त्यांनी या पिंडाबद्दल अधिक माहिती मिळवली आहे.

काय आहे हा पिंड? 

ताशी 1 दशलक्ष मैल... इतक्या हाय स्पीडचा अर्थ असा की, तो लवकरच आकाशगंगेच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होऊन अवकाशात प्रवेश करेल. हे खगोलीय पिंड काय आहे याची शास्त्रज्ञांना अद्याप पूर्ण खात्री नाही, पण बहुधा हा तपकिरी बटू तारा आहे. हे असे तारे आहेत जे ग्रहांपेक्षा मोठे आहेत परंतु त्यांचे वस्तुमान इतके कमी आहे की, ते आपल्या सूर्याप्रमाणे दीर्घकाळ आण्विक संलयन टिकवून ठेवू शकत नाहीत.

नासाचे संशोधक या वस्तूला CWISE J124909.08+362116.0 म्हणतात. त्यांचा असा विश्वास आहे की, ते एकेकाळी दुसऱ्या खगोलीय पिंडासह अस्तित्वात होते. कारण अशा बायनरी जोड्या आकाशगंगेमध्ये सामान्य आहेत. हे शक्य आहे की, तो एका पांढऱ्या बटू ताऱ्याचा साथीदार होता जो सुपरनोव्हा बनला होता.

ही गोष्ट कुठून आली?

मौनाकेआ, हवाई येथील डब्ल्यू.एम. केक वेधशाळेकडून मिळालेल्या डेटावरून असे दिसून येते की, ही जलद उडणारी वस्तू खूप जुनी आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी लिहिले आहे की 'आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या पहिल्या पिढ्यांपैकी हा एक आहे.' जर ही वस्तु खरोखरच तपकिरी बटू असेल, तर अशा प्रकारची वस्तू अव्यवस्थित, उच्च-वेगाच्या कक्षेत सापडण्याची आणि आपल्या आकाशगंगेतून बाहेर पडण्यास सक्षम होण्याची ही पहिलीच वेळ असेल.