NASA ने शेयर केले Solar Flare चे अद्भुत फोटो, पृथ्वीवर काय होणार परिणाम?

नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेने या घटनेचे फोटो काढले आहे.

Updated: Oct 5, 2022, 10:57 AM IST
NASA ने शेयर केले Solar Flare चे अद्भुत फोटो, पृथ्वीवर काय होणार परिणाम? title=

मुंबई : यूएस स्पेस एजन्सी नासाने (NASA) सोशल मीडियावर सूर्याच्या पृष्ठभागावरुन निघणाऱ्या सोलर फ्लेयर्सचे सुंदर फोटो शेअर केलेत. नासाने रविवारी तो क्षण टिपला जेव्हा सूर्याने अंतराळात उर्जेचा एक शक्तिशाली स्फोट केला. माहिती देताना नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितलं की, 2 ऑक्टोबर रोजी सूर्यापासून एक मजबूत सोलर फ्लेयर निघाली. नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेने या घटनेचे फोटो काढले आहे.

नासाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अंतराळात अनेक घटना सातत्याने घडतायत. सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सोलर फ्लेअर्स कॅप्चर केलेत.

सोलर फ्लेअर्स काय आहेत?

सोलर फ्लेअर्स म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागावरून निघणारी चुंबकीय उर्जेची किरणं. या ज्वालामुखी आणि सौर उद्रेकांमध्ये रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, जीपीएसवर परिणाम होण्याची क्षमता आहे. त्यामुळे अवकाशयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. 

सोलर फ्लेअर्स हे सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारं ब्राइट एरिया आहेत. ते काही मिनिटांपासून तासांपर्यंत दृश्यमान असू शकतात.

स्पेस एजन्सीने म्हटलंय की, 2 ऑक्टोबर रोजी कॅप्चर केलेल्या सौर फ्लेअरला "X1 फ्लेअर" म्हणून वर्गीकृत केलं गेलंय. NASA ने नोंदवले की एक्स-क्लास सर्वात तीव्र फ्लेअर्सचे प्रतिनिधित्व करतो, तर संख्या, जी जास्तीत जास्त नऊ पर्यंत पोहोचते, फ्लेअरबद्दल अधिक माहिती देते. 

एप्रिलमध्ये देखील, नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेद्वारे सोलर फ्लेअरचे फोटो कॅप्चर करण्यात यश मिळवलं होतं. सौर फ्लेअर्सचा मानवांवर नकारात्मक प्रभाव पडत नाही. ते केवळ चुंबकीय सोडवून तंत्रज्ञानावर परिणाम करतात.