सुनीता विलियम्संना पृथ्वीवर परतण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार; NASAने प्लान सांगितला

Sunita Williams News: सुनीता विल्यम्स या गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्या परत कधी येणार अशी 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 25, 2024, 08:59 AM IST
सुनीता विलियम्संना पृथ्वीवर परतण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार; NASAने प्लान सांगितला  title=
nasa announce Sunita Williams and Butch Wilmore to return on SpaceX vehicle in February 2025

Sunita Williams News: अमेरिकेची अवकाश यंत्रणा नासाचे अतंराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे पृथ्वीवर कधी परतणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. आता सुनीता विलियम्स यांच्या घरवापसीसाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स या त्यांच्या सहकाऱ्यासह अवकाशात अडकून पडल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या अवकाशात आहे. आता सुनीता विल्यम्स बोइंग स्टारलाइनरच्या ऐवजी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून पृथ्वीवर परतणार आहे.  नासाने याबाबत अधिकृत घोषणा केली ाहे. 

सुनीता विल्यम्स 5 जून रोजी त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांच्यासोबत स्पेस स्टेशन येथे उतरल्या होत्या. स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर दोघेही तिथेच अडकून पडले होते. गेल्या दिड महिन्यांपासून दोघंही अंतराळात अडकून पडले आहेत. आता सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर दोघांनाही स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवर परत आणणार आहेत. नासाकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. दोघंही फेब्रुवारी 2025पर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या माध्यमातून दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. याबाबत नासा आणि स्पेसएक्सने संपूर्ण प्लान तयार केला आहे. 

5 जून रोजी स्पेस स्टेशनला गेले होते सुनीता विल्यम्स 

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन महिन्यांपूर्वी 5 जून रोजी अंतराळवीरात भरारी घेतली आहे. दोन्ही बोईंगच्या स्टारलाइनरच्या माध्यमातून रवाना झाले होते. दोन्ही अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवरुन एका आठवड्यात परत येणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळं ते परत येऊ शकले नाही. दोघं अद्यापही अंतराळात फसलेले आहेत. 

नासाचे चीफ बिल नेल्सन यांनी दिलेल्या माहितीनेनुसार, सुनीता विल्यम्स स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलच्या माध्यमातून फ्रेब्रुवारीपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता आणि बॅरी दोघंही सुरक्षित आणि सुखरुप Crew-9 सोबत परतणार आहेत. बोईंग स्टारलाइनरमध्ये हीलियम लीक आणि थ्रस्टर्समध्ये तांत्रिक कारणांमुळं सुनीला विल्यम्सत्या घरवापसीला विलंब होत आहे.