Mysterious hole in Ocean : जगाच्या पाठीवर अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहे ज्यांचे रहस्य आजही जगासमोर आलेले नाही. जगातील अशा रहस्यामागील कारण गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक शोधण्याचा प्रयत्न करत आहे. काही रहस्यामागील कारण शोधण्यात वैज्ञानिकांना यश आलंय. असं एक भयानक आणि आश्चर्यकारक गोष्टीची रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांच्या हाताला यश आलंय. भारताजवळील हिंद महासागराच्या मधोमध असणारा महाकाय खड्डा ज्याला नरकाचा दरवाजा असं म्हटलं जातं. तर वैज्ञानिक भाषेत या खड्ड्याला ग्रॅव्हिटी होल म्हटलं जातं. नेमकं हा खड्डा कशामुळे आणि काय आहे या खड्ड्यात दडलंय याचा शोध वैज्ञानिकांनी लावलाय.
हिंद महासागराच्या पाण्यात निर्माण झालेला हा महाकाय खड्ड्या भारताच्या नैऋत्येला फक्त 1200 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पाण्याची पातळी इतर जगाच्या तुलनेत 348 फूट कमी आहे. हा खड्डा 1948 मध्ये सापडला तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याला ग्रॅविटी होल असं नाव ठेवलं. तेव्हापासून या खड्ड्याचे रहस्य शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी दिवसरात्र एक केलं. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं.
समुद्रात 31 लाख चौरस किलोमीटर पाण्यात पसरलेल्या या क्षेत्राबाबत शास्त्रज्ञांनी सांगितलंय की, या भागातील गुरुत्वाकर्षण इतके कमकुवत आहे की पाण्याची पातळी उर्वरित क्षेत्राच्या तुलनेत खाली गेली आहे. 2023 मध्ये जर्नल जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हा प्रदेश 140 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाला होता.
अभ्यासात असं आढळून आलंय की टेथिस समुद्र त्याच्या निर्मितीसाठी जबाबदार आहे, जो आता नामशेष झालाय. लाखो वर्षांपूर्वी, टेथिस समुद्र हा पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, मात्र 180 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवानाच्या तुटण्याच्या वेळी तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे, कवचाचे तुकडे आवरणाखाली बुडाले आणि नंतर ते युरेशियन टेक्टोनिक प्लेटकडे जाऊ लागले. या प्रक्रियेत टेथिस समुद्राचा तळ आवरणाखाली येऊ लागला.
या टेशी समुद्रावर हिंदी महासागर तयार झाला. टेथिस समुद्राचा तळ हिंदी महासागराखाली गाडला गेल्याने आणि त्याचा मॅग्मा वितळत आहे. त्यामुळे या प्रदेशाचे एकूण वस्तुमान कमी झाले आणि गुरुत्वाकर्षण कमकुवत झाले. त्यामुळे येथील पाण्याची पातळी जगाच्या तुलनेत खाली गेली.