Trending Love Story : नोकराने बनवलेल्या मटण करीच्या प्रेमात पडली मालकिण आणि पुढे...

Viral Love Story :  चिकन (Chicken), मटण (Mutton) आणि फिशवर (Fish) तर ते मनसोक्त ताव मारताना दिसतात. चिकन बिर्याणी (Chicken biryani), मटण बिर्याणी (Mutton Biryani), तंदुरी चिकन (Tandoori Chicken) अशा अनेक पदार्थांसाठी भारतीय वेडे आहेत. जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर मटण करीचाच बेत करा, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Updated: Oct 27, 2022, 11:44 AM IST

Mutton_Curry_Unique_Love_Story

Mutton Curry Unique Love Story :  भारतीय खूप जास्त खवय्येगिरी करतात. वेगवेगळ्या शहरातील एकशे एक लजतदार आणि जिभेचे चोचले पुरवणारे असंख्य हॉटेल आपल्याला दिसतात. भारतीय हे खूप जास्त नॉनव्हेज लव्ह आहेत. चिकन (Chicken), मटण (Mutton) आणि फिशवर (Fish) तर ते मनसोक्त ताव मारताना दिसतात. चिकन बिर्याणी (Chicken biryani), मटण बिर्याणी (Mutton Biryani), तंदुरी चिकन (Tandoori Chicken) अशा अनेक पदार्थांसाठी भारतीय वेडे आहेत. जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर मटण करीचाच बेत करा, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

तुम्हाला मटण करी आवडते का?

सोशल मीडियावर अनेक असे एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागतं नाही. सध्या सोशल मीडियावर (Social media) एका लव्ह स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या कपलची अनोखी लव्ह स्टोरी (unique love story of a couple) सोशल मीडियावर Trending आहे. अशी म्हणं आहे की पुरुषाचं प्रेम जिंकायचं असेल तर त्याचा हृदयापर्यंतचा रस्ता पोटातून जातो. म्हणजे त्याला चांगले चांगले पदार्थ खायला देऊन तुम्ही त्याचं प्रेम जिंकू शकता. मटण करी जर तुम्हाला आवडतं असेल तर ही लव्ह स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. 

अनोखी लव्ह स्टोरी

असं म्हणतात ना की, प्रेमाची सुरुवात ही भांडणातून होते. असंच काहीस आलिया (Alia) आणि रफिकसोबत (Rafiq) घडलं. हे दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांचं भांडण झालं होतं. आलियाने तर रफिकचा कानशिलात लगावली होती. यानंतर रफिकने आलियाला स्वतःचे मटण खायला दिले आणि मग काय त्या क्षणात सगळंच बदलं. (Mutton Curry Unique Love Story Viral on social media nmp)

अशी घडली लव्ह स्टोरी 

पाकिस्तानी यूट्यूबर (Pakistani YouTuber) सय्यद बासित अलीने या जोडप्याची लव्ह स्टोरी सांगितली आहे. रफिकच्या सांगण्यानुसार आलियाची आणि त्याची पहिली भेट ही रिक्षामध्ये झाली. या रिक्षामध्ये त्यांचं भांडण झालं. आलियाने तर रफिकला कानाखाली मारलं होतं. आलिया जेव्हा रिक्षातून उतरली तेव्हा रफिक तिच्या मागे गेला...अगदी अनेक दिवस तो तिच्या घरी जाऊ लागला पण त्याला काही केल्या माफी मिळतं नव्हती. मग एकेदिवशी रफिक आलियाशी नोकरीसंदर्भात बोला. आपल्याला चांगलं जेवण बनवता येतं आणि आपण घरातील इतर कामं पण करु शकतो असं सांगितलं. 

...आणि मग काय पडली नी ती प्रेमात

यानंतर रफिकला आलियाच्या घरी नोकरी लागली. पहिल्याच दिवशी रफिकने खास मटण हंडी (Mutton handi) बनवली. आलियाला ही डिश इतकी आवडली की ती रफिकच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर या दोघांनी लग्न पण केलं आहे. आज रफिक घर सांभाळतो आणि आलिया ऑनलाईन व्यवसाय करते. विशेष म्हणजे या दोघांमध्ये 33 वर्षांचं अंतर आहे. आलिया 22 वर्षांची आहे तर रफिक 55 वर्षांचा आहे. प्रेमात वय, रंग, भेदभाव, भाषा हे सगळं व्यर्थ असतं. याच हे एक उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावर गाजणारी ही लव्ह स्टोरी पाकिस्तानमधील आहे.