तब्बल 8 वर्षांनंतर झाला गुन्ह्याचा उलगडा, कर्मचाऱ्यानेच संपवलं होतं बॉसचं कुटूंब!

चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरार, कर्मचाऱ्याचं प्रमोशन न करणं बॉसला पडलं महागात!

Updated: Sep 16, 2022, 11:22 PM IST
तब्बल 8 वर्षांनंतर झाला गुन्ह्याचा उलगडा, कर्मचाऱ्यानेच संपवलं होतं बॉसचं कुटूंब! title=

Crime News : नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पगारवाढ या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चांगली पगारवाढ आणि पदामध्ये बढती मिळाल्यावर कर्मचार्‍याचे मनोबल तर वाढवतेच पण कामासाठी अधिक जबाबदार बनवते. पण कष्ट करूनही जेव्हा त्याला अपेक्षेनुसार गोष्टी मिळत नाहीत, तेव्हा त्या कर्मचाऱ्याची चिडचिड जास्त होते आणि कामात लक्ष लागत नाही. 

अखेर कंटाळून काहीजण राजीनामा सुद्धा देतात. मात्र एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्याने असं काही केलं की सर्वानाच धक्का बसला. अमेरिकेमधील फॅंग ​​लू या कर्मचाऱ्याने बॉससह त्याच्या परिवारावर गोळीबार केला. फॅंग ​​लू हा मूळ चीनचा रहिवासी होता. त्यानंतर आरोपी चीनला पळून गेला होता. चीनमधून पुन्हा अमेरिकेत आल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?
फॅंग ​​लू हा अमेरिकेतील 'यालफिल्ड सर्व्हिसेस कंपनी' श्लेंबरगरमध्ये काम करत होता. बॉस 'फॅंग ​​लू'ला काही कारणावरून खूप ओरडला होता, त्यामुळे सर्वांसमोर अपमान केल्याचा राग फॅंग ​​लूच्या मनात होता. त्यासोबतच बॉसने त्याचं प्रमोशही केलं नाही यामुळे फॅंग ​​लूला राग अनावर झाला अन् त्याने थेट बॉसच्या पत्नी आणि मुलीला आणि मुलाला गोळ्या मारून ठार केलं होतं.  ही घटना 2014 मध्ये घडली होती.

आरोपी फॅंग ​​लू हा हत्याकांडानंतर फरार झाला होता. तो थेट त्याच्या देशात चीनमध्ये पळून गेला होता. पण 8 वर्षांनी तो पुन्हा अमेरिकेमध्ये परतला, फॅंग लू याला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून अटक करण्यात आली आहे.