ओमायक्रॉनबाबत सर्वात महत्त्वाची माहिती उघड, पाहा दक्षिण अफ्रिकेतील संशोधकांचा काय आहे दावा?

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत (Omicron Varient) सर्वात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

Updated: Dec 3, 2021, 08:29 PM IST
ओमायक्रॉनबाबत सर्वात महत्त्वाची माहिती उघड, पाहा दक्षिण अफ्रिकेतील संशोधकांचा काय आहे दावा? title=

मुंबई : शेजारच्या राज्यात म्हणजेच कर्नाटकात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची लागण असलेले 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यासह देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात राज्यातही अजून काही संशयितांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. असं असताना ओमायक्रॉनबाबत सर्वात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. (most important information about Omaicron has been revealed See what the researchers in South Africa claim)

ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण हे डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचं उघड झालं आहे, असं संशोधकांच्या अहवालात म्हंटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांचा हा प्राथमिक अहवाल आहे. कोरोना झाल्यामुळे तयार झालेल्या इम्युनिटीचाही त्यावर परिणाम होत नाही, अशी माहितीही या अहवालातून समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीलाही कोरोनाचा नवा व्हेरिएंट जुमानत नाही.