अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?

Updated: Jan 12, 2023, 11:18 AM IST
अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO  title=
Most Coldest City in the World yakutsk russia Where temperature sank to minus -72 to -83 degree Celsius Viral News

Coldest Village Of The World : इथं महाराष्ट्रामध्ये (Maharashtra weather update) हिवाळ्यात तापमान 5 अंशांवर गेलं तर हुडहूडी भरते. मुंबईकरांसाठी (Mumbai temprature) तर 15 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे महाबळेश्वरलाच (Mahabaleshwar) जाऊन आल्याचा अनुभव घेतल्यासारखं. या इतक्याच थंडीत आपण पार गारठून जातोय. फारफारतर हिमाचल (Himachal pradesh) आणि काश्मीरमध्ये (Kashmir) उणे 10 अंशांपर्यंत जाण्याचं धाडसही करतो. इतक्या कमी तापमानातून जाऊन आल्यानंतर आपण काहीतरी ग्रेट केलंय असंच काहींना वाटतं. चला, मग समजा तुम्हाला जगातील सर्वात थंड गावात जाण्याची संधी दिली तर.... ? 

आता तुम्ही म्हणाल तर काय, जाऊ की. तिथली थंडी अनुभवू. बघा हं अतिउत्साह दाखवू नका. कारण, हे जगातलं सर्वात थंड गाव इतकं जास्त थंड आहे की त्याविषयी वाचूनच तुम्ही थरथरू लागाल. कारण? कारण आहे तितकं तापमान. विश्वाव बसणार नाही, पण जगातल्या या गाववजा एका छोट्याशा शहराचं तापमान हे - 50 पेक्षाही कमी असतं. अनेकदा हे तापमान -75 ते -83 इंश सेल्सिअसच्या घरात असतं. या ठिकाणाचं नाव आहे याकुत्स्क (Yakutsk) आणि इथल्या नागरिकांना, संस्कृतीला याकुतिया म्हणूनही संबोधलं जातं. 

अन्नपाणी सगळं गोठतं, मग ही लोकं खातात तरी काय? 

रशियातील याकुत्स्क या शहराचे अनेक फोटो आणि आताआतातर इथले अनेक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत (Life in worlds coldest village). यामध्ये काही स्थानिक नागरिक तर, इथली जीवनशैली जगासमोर यावी म्हणून व्लॉगिंगसुद्धा करत आहेत. तुम्हाला माहितीये का, याकुत्स्कमध्ये (Life in yakutsk) इतकी थंडी आहे, की इथं खाण्यापिण्याचे पदार्थ अगदी सहजपणे गोठतात. इतकंच काय तर अनेकदा इथले कपडेही दगडासारखे टणक होतात. 

अंडी, मॅगी इतकंच काय तर इथं मासेही गोठतात. तुम्हाला माहितीये का, याकुस्त्कमध्ये घोड्याचं मांस (Horse meat) आवडीनं खाल्लं जातं. इथं नदीच्या प्रवाहात असणारे मासे खाण्यासाही (Frozen fish) स्थानिकांची पसंती असते. घोड्याचं मांस, रस्तापासून आणि त्याच्या अवयवांपासून तयार केलेले पदार्थ आणि तत्सम इतर गोष्टी इथं खाल्ल्या जातात. शरीराला आवश्यक ती पोषक तत्वं आणि शरीराला मिळणारी नैसर्गित ऊब यासाठी हे गरजेचं असतं असं इथले स्थानिक सांगतात. (raw fish) कच्चा मासा तासून जसं आपल्या इथं आईस्क्रीम रोल मिळतात तसं इथं कच्च्या माश्यांच्या तासांपासून तयार झालेले फ्लेक्स रोल खाण्याला पसंती दिली जाते. इथं पिण्याचं पाणी बर्फ वितळवून घेतलं जातं. अनेकदा घरातील लहान मुलं, पुरुष मंडळी नदीपाशी जाऊन तिथून बर्फाचे मोठाले तुकडे आणतात आणि घरी एखाद्या मोठ्या भांड्या ते आगीच्या सहाय्यानं वितळवण्यात येतात. 

साधारण 3.60 लाखांच्या जवळपास लोकसंख्या असणारा हा भाग रशियातील सायबेरिया प्रांतात येतो. इशं ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांमधील काळ अतीशय आव्हानात्मक असतो. जुलै महिन्यात मात्र इथं तापमान थेट 24 अंशांवर पोहोचतं. तिथल्या नागरिकांकाठी हा उन्हाळाच म्हणा ना. 

दुपारी 3 वाजता सूर्यास्त... 

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उगवणारा सूर्य इथं काही तासांनी म्हणजेच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुडूप होतो. दुपारीच सूर्यास्त झाल्यामुळं इथं रात्र तशी मोठीच. इथं नागरिक आजारी पडत नाहीत का? तर, तसं नाही. इथंही थंडीपासून वाचण्यासाठी स्थानिक अनेक उपाय करताना दिसतात. लोकरी आणि थंडीपासून बचाव करणारे कपडे म्हणजे त्यांचं मोठं शस्त्र. अतीथंड प्रदेशात पहिल्या स्थानावर असणाऱ्या या ठिकाणी नागरिक 20 मिनिटांहून जास्त वेळासाठी घराबाहेर येत नाहीत. कारण काही क्षणांतच त्यांचे हातपाय सुन्न पडू लागतात. जगाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहून तुम्ही अचंबित व्हाल! हेसुद्धा त्यातलंच एक.