रानगव्यांना मारण्यासाठी 12 जणांची भरती; तब्बल 45 हजार अर्ज दाखल! नक्की कुठे घडतंय? वाचा

रानगव्यांना मारण्यासाठी कौशल्याआधारीत 12 तरूणांची भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे त्यासाठी 45हजार तरुणांनी अर्ज केले आहेत.

Updated: May 7, 2021, 07:49 PM IST
रानगव्यांना मारण्यासाठी 12 जणांची भरती; तब्बल 45 हजार अर्ज दाखल! नक्की कुठे घडतंय? वाचा title=

 वाशिंगटन :  अमेरिकेच्या ग्रँड केन्यन राष्ट्रीय उद्यानात (grand canyon national park) रानगव्यांच्या प्रचंड संख्येला कमी करण्यासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. रानगव्यांना मारण्यासाठी कौशल्याआधारीत 12 तरूणांची भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे त्यासाठी 45हजार तरुणांनी अर्ज केले आहेत.

 राष्ट्रीय पार्कमध्ये शिकारीला प्रतिबंध

 बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, खरं तर राष्ट्रीय उद्यानांमध्ये प्राण्यांच्या शिकारीला बंदी आहे. परंतु या नियमांमधून रानगव्यांना वगळण्यात आले आहे. रानगव्यांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येला नियंत्रित करण्यासाठी 12 कुशल स्वयंसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे. जे रानगव्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासाठी 45 हजार लोकांनी काम करण्याची इच्छा दाखवली आहे.
 
 वन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत रानगव्यांची संख्या गतीने वाढली आहे. त्यामुळे त्यांना मारण्यासाठी नियोजनाची गरज आहे.  रानगव्यांच्या झुंडीत 600 रानगवे असतील. ही संख्या 200 वर आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मातीची झिज आणि जलप्रदुषण कमी करण्यास मदत होणार आहे.