Viral Video: माकडाने पर्यटकाच्या पर्समधून पैसे काढून उडवले

माकडं कसे असतात हे कोणाला सांगण्याची गरज नाही. ते कधी काय करतील कोणालाच सांगता येणार नाही.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2018, 01:12 PM IST
Viral Video: माकडाने पर्यटकाच्या पर्समधून पैसे काढून उडवले title=

मुंबई : माकडं कसे असतात हे कोणाला सांगण्याची गरज नाही. ते कधी काय करतील कोणालाच सांगता येणार नाही.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. चीनमधील सिचुआनच्या माउंट एमीचा हा व्हिडिओ आहे. येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना माकडं खूप सतवतात असं देखील म्हटलं जातं.

एका टूरिस्टची एका माकडाने पर्स चोरली आणि त्यानंतर रेलिंगवर जाऊन बसला. यानंतर पर्समध्ये असलेल्या नोटा चक्क त्याने काढून खाली टाकून दिल्या. काही वेळेनंतर पर्स टाकून तो तेथून निघून गेला. यानंतर दुसऱ्या एका माकडाने ती पर्स घेतली. सध्या हा व्हि़डिओ सोशल माडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ