Monday Blues: सोमवारी कामावर जायला तुम्हालाही कंटाळा येतो का? सोमवारी काम करणं म्हणजे जगातील सर्वात कठीण काम वाटतं? सोमवारचा दिवस कॅलेंडरमधून निघून जावा असं वाटतं किंवा सोमवारी ऑफिसला दांडी मारावी असं देखील वाटतं? हे केवळ तुमच्यासोबत घडत नाही. हे अनेकांसोबत घडतं आहे. अनेकजण याबाबत सोशल मीडियावरून आपापलं मत नोंदवत असतात. याचीच दखल आता थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनीही घेतली आहे. सोमवारबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने (guinness world records) अधिकृत ट्विट केलं आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृत ट्विट (Official tweet) करत आठवड्याचा पहिला दिवस सोमवारबाबत एक ट्विट केलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोमवारी याबाबतचं ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की आम्ही सोमवारला आठवड्यातील सर्वात खराब ( worst day of the week) दिवस म्हणून रेकॉर्ड करत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. हे ट्विट वाचून अनेकांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने असं का केलं याबाबतचा प्रश्न पडला. आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारलाच का सर्वात खराब ( Why monday is worst day) दिवस म्हणून रेकॉर्डमध्ये समाविष्ट केलं गेलं? जाणून घेऊया
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याबाबतचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. सोमवार हा शनिवार आणि रविवार म्हणजे दोन सुट्ट्यांच्यानंतर येतो. यामुळे अनेकांना ऑफिसला किंवा इतर ठिकाणी जायला अनेकांना कंटाळा येतो. सोशल मीडियावर ( netizens on social media about monday) अनेकजण सोमवारबाबत, सोमवारी काम करण्याबाबत नकारार्थी लिहीत देखील असतात. सोमवारी कामाचं जास्त प्रेशर असतं असं अनेकांचं मत आहे. म्हणूनच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने अशा प्रकारचं अधिकृत ट्विट केलं आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सप्रमाणे फार कमी लोकांना सोमवारी सुट्टी असते. अशात सोमवारी अनेकजण काम संपवण्याचा प्रयन्त करतात.
we're officially giving monday the record of the worst day of the week
— Guinness World Records (@GWR) October 17, 2022
या ट्विटला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केलं लाईक केलं आहे. हजारोंनी याला री-ट्विट देखील केलं आहे. यावर नेटकऱ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. ही घोषणा करायला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने वेळ लावला, असं देखील अनेकांचं म्हणणं आहे.
monday is worst day of the week says guinness world records in their official tweet