मोदी - बायडेन यांच्या भेटीमुळे पाकिस्तान- चीनचा तीळपापड; अफगानिस्तान, दहशतावाद, विस्तारवादावर चर्चेची शक्यता

अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षा कमला हॅरिस यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन याच्याशी विशेष चर्चा करणार आहेत

Updated: Sep 25, 2021, 08:58 AM IST
मोदी - बायडेन यांच्या भेटीमुळे पाकिस्तान- चीनचा तीळपापड; अफगानिस्तान, दहशतावाद, विस्तारवादावर चर्चेची शक्यता title=

वॉशिंगटन : अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षा कमला हॅरिस यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्याशी विशेष चर्चा करणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची भेट होणार होणार आहे. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर बायडेन आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. 

चीन - पाकिस्तान हैराण
जगातील अनेक देशांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातील बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत दहशतवाद आणि विस्तारवादबाबत दोन्ही देश चर्चा आणि रणनिती निश्चित करण्याची शक्यता असून यामुळे चीन आणि पाकिस्तानचा तीळपापड होणार आहे. याशिवाय पीएम मोदी आज क्वाड देशांच्या समिटमध्ये सामिल होणार आहेत.

या 10 मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
1 भारत - अमेरिका वेश्विक भागीदारी
2 द्विपक्षीय व्यापर आणि गुंतवणूक संबध मजबूत करणे
3 संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी 
4 अपारंपारिक ऊर्जेची निर्मिती भागीदारी वाढवणे
5 दहशतवादाविरोधात रणनिती
6 सीमेवर दहशतवाद रोखण्यासाठी मदत
7 अफगानिस्तान संकट
8 चीनच्या विस्तारवादाला लगाम
9 कट्टरतावाद
10 ग्लोबल वार्मिंग

अफगानिस्तानचा मुद्दा 

द्विपक्षीय बैठकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबधांची समिक्षा करतील. दोन्ही नेत्यांमध्ये अफगानिस्तानचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला जाण्याची शक्यता आहे. तालिबानला चीन आणि पाकिस्तानची मदत मिळत आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. संयुक्त राष्ट्राच्या भाषणात जो बायडेन यांनी चीनपासून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेम्ब्लीमध्ये बायडेन यांनी राष्ट्रध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा भाषण दिले होते. त्यात त्यांनी दहशतवादाचाही उल्लेख केला होता.

चीनची वाढती शक्ती रोखणे अमेरिकेला भारताच्या मदतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील दहशतवाद आणि विस्तारवादाविरोधातील सहयोग नव्या उंचीवर पोहचणार आहे.