नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका, राष्ट्रपतींनी संसद सभागृह केले विसर्जित

 राष्ट्रपती विद्या देवी भंडारी  यांनी (President Bidya Devi Bhandari) संसद विसर्जित केली आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. 

Updated: May 22, 2021, 02:52 PM IST
नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका, राष्ट्रपतींनी संसद सभागृह केले विसर्जित title=

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) राजकीय तिढा न सुटल्याने नवा पेच निर्माण झाला. या ठिकाणी अनेक दिवसांपासून राजकीय संकट संपण्याचे नाव घेत नव्हते. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी  पंतप्रधान के.पी.शर्मा ओली आणि विरोधी पक्षा नेत्यांनी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी (President Bidya Devi Bhandari) यांना पाठिंबा असलेल्या खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देत नवीन सरकार बनविण्याचा दावा केला. आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवण्यात यावे, अशी दोन्ही नेत्यांकडून मागणी करण्यात आली. मात्र, राष्ट्रपती विद्या देवी भंडारी  यांनी (President Bidya Devi Bhandari) संसद विसर्जित केली आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. आता नोव्हेंबर महिन्यात या मध्यावती निवडणुका (Mid-Term Elections) होणार आहेत. आहे. (Mid-Term Elections in Nepal)

नोव्हेंबरमध्ये निवडणुका

राष्ट्रपती अध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी नोव्हेंबरच्या तारखा दिल्या आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी संसदेचे सभागृह विसर्जित केले आहे. त्यांनी देशात मध्यावधी निवडणुका घेण्याच्या नव्या तारखांची घोषणा केली आहे. या निवडणुका 12 आणि 19 नोव्हेंबरला होणार आहेत. त्याचबरोबर, पंतप्रधानपदासाठी शेर बहादूर देउबा  (Sher Bahadur Deuba) आणि के. पी. शर्मा ओली (K.P.Sharma Oli)या दोघांचेही दावे राष्ट्रपतींनी फेटाळून लावले.

विश्वास मत ठराव ओली हरले

ओली सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष आहेत. घटनेच्या कलम 76 (3) नुसार त्यांनी  14 मे रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याआधी चार दिवसांपूर्वी त्यांना संसदेत विश्वास मत ठराव जिंकण्यात अपयश आले नेपाळच्या 275 सदस्यांच्या संसद सभागृहात 121 जागा असलेल्या सीपीएन-यूएमएल हा सर्वात मोठा पक्ष होता, परंतु बहुमत सरकार बनण्यासाठी 136 जागांची आवश्यकता होती. त्याच वेळी, देउबा यांनी 149 खासदारांच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र घेऊन राष्ट्रपती कार्यालय गाठले, परंतु त्याआधी ओली यांनी पत्र पाठवून सरकार स्थापनेचा दावा सादर केला होता. मात्र, राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी कोणाकडे बहुमत नसल्याने दोघांचे सरकार स्थापन करण्याचे दावे फेटाळले आणि संसद विसर्जित केली. त्यावेळी मध्यावती निवडणुकीची घोषणा केली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x