Mexico Gun Firing : अमेरिका पुन्हा गोळीबाराच्या घटनेने हादरली . उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोत एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत.ऑल-टेरेन कार रेसिंग शो दरम्यान हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. गॅस स्टेशनवरच्या बंदूकधारी लोकांकडून गोळीबार करण्यात आल्याचं समजत आहे. मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियामध्ये एका कार शोदरम्यान हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर येथे उपस्थितांची पळापळ झाली.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेला हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मेक्सिकोच्या (Mexico) बाजा कॅलिफोर्नियामध्ये एका कार शोदरम्यान अचानक गोळीबार झाला. यात 10 लोक ठार झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नसून गोळीबारात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
रॉयटर्सच्या माहितीनुसार बंदूकधारी पुरुष एका राखाडी व्हॅनमधून बाहेर पडले गॅस स्टेशनवर गोळीबार सुरु केला. महापालिका आणि राज्य पोलीस, मरीन, अग्निशमन विभाग आणि मेक्सिकन रेड क्रॉस, इतर एजन्सीसह घटनास्थळी दाखल झाले. महापौर अरमांडो अयाला रोबल्स यांनी सांगितले की राज्याचे अॅटर्नी जनरल रिकार्डो इव्हान कार्पियो सांचेझ यांनी गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक नेमले आहे. पीडितांची ओळख किंवा राष्ट्रीयत्व अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही.
दरम्यान, याच आठवड्यात मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका पोलिसाचाही सहभाग होता. फार्मिंगटन शहरात हा गोळीबार झाला होता. सातत्याने अशा घटना घडत असल्याने तिंच्या व्यक्त करण्यात येत आहे.