काबुल : अफगानिस्तान (Afghanistan) ची सत्ता हातात येताच तालिबानने (Taliban) त्यांचं निर्णय देशातील नागरिकांवर थोपवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानने आता आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानने सोमवारी संपूर्ण देशात कोएजुकेशनवर बंदी घातली आहे. सोबत हा देखील आदेश काढला आहे की, पुरुष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवू शकणार नाहीत.
सोमवारी अफगानिस्तानच्या उच्च शिक्षण मंत्री शेख अब्दुल बाकी हकानी यांनी याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 'अफगानिस्तानच्या लोकांना हे दाखवावं लागेल की, ते धार्मिक आणि राष्ट्रीय मुल्यांच्या प्रति मजबूत आहेत. यामध्ये युवा वर्गाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता देशातील शिक्षक आणि तज्ज्ञांची जबाबदारी आहे की, त्यांनी देशाच्या निर्माणासाठी आपली भूमिका पार पाडावी.'
हक्कानी यांनी म्हटलं की, 'लवकरच इस्लामिक मूल्यांचं पालक करताना मुले आणि मुलींसाठी शाळा सुरु केल्या जातील. देशातील राजकीय व्यवस्था अफगानिस्तानातील शिक्षण व्यवस्था आणखी मजबूत करेल आणि आणखी विकसीत करण्यात मदत करेल.'
हक्कानी यांनी म्हटलं की, आता पुरुष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवणार नाहीत. तालिबानच्या या आदेशामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं नुकसान होणार आहे. कारण अधिक महाविद्यालयांमध्ये पुरुष शिक्षकच आहेत.