जगातील सर्वात 'खतरनाक' जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण...; अंगावर शहारे आणणारा Video

Men Feeding Cheetahs: जगातील सर्वात धोकादायब जॉब कोणता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर एकदा हा व्हिडिओ पाहाच. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 26, 2023, 09:33 AM IST
जगातील सर्वात 'खतरनाक' जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण...; अंगावर शहारे आणणारा Video title=
Men Feeding Cheetahs Most Dangerous Job In The World Shocking Video

Viral Video In Marathi: कामाच्या ठिकाणी असणारा ताण, ऑफिसमधील वातावरण यामुळं कधी ही नोकरी सोडून द्यायची इच्छा होते. भारतातील 40 टक्के नोकरदार ते करत असलेल्या नोकरीवर खुश नाहीयेत. पण जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथले काम राहून तुमच्या पायाखालची जमिनच हादरले. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती करत असलेले जोखमीचे काम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोज मरणाची भीती अनुभवणे काय असते ते या दोन व्यक्तींना पाहून कळेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ही सगळ्यात धोकादायक नोकरी असल्याचे नेचकरी म्हणत आहेत. काय आहे हा व्हिडिओ आणि नोकरी हे जाणून घेऊया सविस्तर. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, दोन व्यक्ती चक्क चित्त्यांच्या पूर्ण कळपाला खाणं पोहोचवत आहे. या दोन व्यक्तींच्या आजूबाजूला चित्त्यांची पूर्ण झुंड आहे. त्यांचे हे रोजचे काम आहे.हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की हा जगातील सर्वात खतरनाक जॉब आहे. सोशल मीडियावर एक्स (ट्विटरवर) हा व्हिडिओ  @TheFigen_ नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यात दोन व्यक्ती एकाचवेळी अनेक चित्त्यांना जेवण देताना दिसत आहेत. चित्त्यांना जेवण देणारे व्यक्ती हे नॅशनल पार्कमधील कर्मचारी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

जगातील सगळ्यात धोकादायक जॉब 

तसं बघायला गेलं तर चित्ता हा शिकार करणारा प्राणी आहे. वाघ, सिंह, बिबट्याप्रमाणेच चित्ता देखील शिकार करतो. चित्ता हा चपळ असल्याने त्याला कोणीच मात देऊ शकत नाही. अशातच इतक्या भयंकर प्राण्याच्या जवळ जाऊन जेवण देणे हे धोक्याचे काम आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका ट्रॉलीमध्ये मांस भरलेले दिसत आहे. (Men feeding cheetahs viral video)  थोडे-थोडे मांस उचलून दोन व्यक्ती तिथे असलेल्या चित्त्यांना देत आहेत. एकाच वेळी इतक्या चित्त्यांना समोर पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. मात्र दोन व्यक्तीअगदी सहजतेने त्यांचे काम करत आहेत. व्हिडिओत दोन चित्ते मांसाच्या तुकड्यासाठी भांडताना देखील दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ अफ्रिकेतील असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला  1.1 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तर, 22 हजार लोकांनी हा व्हिडिओला लाइक केले आहे. या व्हिडिओवर आणि या दोन व्यक्तीच्या नोकरीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करुन सांगा.