तालिबानी नेत्याची Masood ने घेतली भेट, भारतावर हल्ल्यासाठी मागितली मदत

मसूद अजहर (Masood Azhar) ने तालिबानी (Taliban) नेता मुल्ला बरादर (Mullah Baradar) ची भेट घेतली आहे. ही मुलाखत 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान झाली. ही बैठक ISI ने ठरवली होती.

Updated: Aug 27, 2021, 08:08 PM IST
तालिबानी नेत्याची Masood ने घेतली भेट, भारतावर हल्ल्यासाठी मागितली मदत title=

काबुल: अफगाणिस्तान (Afghanistan) वर तालिबान (Taliban)ने ताबा मिळवल्यानंतर भारतासाठी देखील ती धोक्याची घंटा मानली जात आहे. भविष्यात अफगाणिस्तान पाकिस्तानसाठी दहशतवादाचं सुरक्षित स्थळ ठरु शकतं. अफगाणिस्तानातून भारताविरोधात पाकिस्तान (Pakistan) कट रचू शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद (Jaish e Mohammad) चा मुख्य दहशतवादी मसूद अजहर (Masood Azhar) ने तालिबानी (Taliban) नेता मुल्ला बरादर (Mullah Baradar) ची भेट घेतली आहे. ही मुलाखत 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान झाली. ही बैठक ISI ने ठरवली होती.

भारताविरुद्ध मागितली मदत

सूत्रांच्या माहितीनुसार मसूद अजहर (Masood Azhar)ने अब्दुल राउफसोबत मुल्ला गनी बरादरची भेट घेतली. ज्यामध्ये मसूद अजहरने तालिबान (Taliban)कडे भारताविरोधी कारवायांसाठी मदत मागितली आहे. मसूद अजहरने बरादरला जैशच्या काश्मीर ऑपरेशनसाठी मदत मागितली आहे.

पाकिस्तानच्या मदतीमुळेच तालिबानी 15 ऑगस्टला राजधानी काबुलसह अफगाणिस्तानच्या बऱ्याच भागाचा ताबा मिळवू शकले. त्यामुळे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांना देखील देश सोडून जावं लागलं. पाकिस्तान आता अफगाणिस्तानात पाय पसरण्यासाठी मोकळा झाला आहे.