Viral Video : Spiderman सारख्या धावत्या मेट्रोवर पळू लागला, व्हिडीओ पाहून फुटेल घाम

Metro Viral Video : सोशल मीडिया मेट्रोचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. धावत्या मेट्रोवर तो तरुण चढतो आणि पळायला लागतो...हा धक्कादायक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 11, 2023, 05:56 PM IST
Viral Video : Spiderman सारख्या धावत्या मेट्रोवर पळू लागला, व्हिडीओ पाहून फुटेल घाम  title=
man ran on moving metro in new york city Shocking video viral on Internet trending news

Metro Viral Video : सोशल मीडियावर मनोरंजक असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. क्षणा क्षणाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजक असो किंवा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावर काही व्हिडीओ तर इतके भीतीदायक असतात ते पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतो. सोशल मीडियावर मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध आहेत. मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोचे असंख्य व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. असाच एक मेट्रोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हैराण करुन सोडलं आहे. (man ran on moving metro in new york city Shocking video viral on Internet trending news)

हे कुठल्या चित्रपटातील दृश्य नाही!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण Spiderman सारखा मेट्रोवर चढता मग धावत्या मेट्रोवर तोही धावायला लागतो. हा भीतीदायक स्टंट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्यक्तीचा हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील newyork only या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. 

हा धक्कादायक व्हिडीओ अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुसाट वेगाने एक मेट्रो स्टेशनच्या दिशेने येत आहे. प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांनी मेट्रोकडे बघताच त्यांना धक्का बसला. कारण त्या मेट्रोच्या छतावर एक तरुण उभ्या आहे. मेट्रो पुढे गेल्यावर तो उलट्या दिशेने फिरला आणि सुसाट वेगाने धावत असलेल्या मेट्रोवर तोही धावू लागला. हे पाहून स्टेशनवर उपस्थिती प्रवाशांना घाम फुटला. अनेकांनी त्या तरुणाचा हा जीवघेणा स्टंट आपल्या कॅमेऱ्याक कैद केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका यूजरने लिहिलं आहे की, 'जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचं कुटुंबीय मेट्रोच्या लोकांवर गुन्हा दाखल करतील.' दुसऱ्या युजरने लिहिलेय की, 'त्या व्यक्तीला मरण्यासाठी अनेक पर्याय होते.'