रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश; चंद्र मोहिमेला मोठा धक्का

रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असतानाच धक्कादायक अपडेट समोर आली आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 

Updated: Aug 20, 2023, 03:06 PM IST
रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश; चंद्र मोहिमेला मोठा धक्का title=

Russia's Luna-25 has crashed into the moon : रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे  Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 19 ऑगस्टला  Luna-25 यानाच्या ऑपरेटिंगमध्ये तांत्रिक बिघाड आला होता. आता रशियाचे  Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असताना यानच क्रॅश झाले आहे.  

Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते.  19 ऑगस्टला  दुपारी 14:10 वाजता रशियाच्या  Luna-25  लँडरला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये ढकलण्यासाठी अंतिम डी-बूस्ट करण्यात आले. मात्र, डी-बूस्टची कमांड या लँडरला मिळाली नाही. रशियाच्या यानाचे डी-बूस्ट होवू शकले नाही. Luna-25 कमांड नुसार काम करत नसल्याने  या मोहिवर काम करणारी वैज्ञानिकांची टीम यान पुन्हा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होती. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने याबाबतचे वृत्त दिले होते. 

रशियन यान भरकटले

रशियाच्या मिशन लुना-25 मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले होते. लूना-25 कक्षा बदलण्याताना अयशस्वी झाल्याने त्यामुळे ते भरकटले. त्याचा मुळ मार्ग गमावला. रशियन स्पेस एजन्सी लुना-25 शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

दहा दिवसात रशियाचे यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न फसला

रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच मून मिशन हाती घेतले होते. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून  रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणि अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने  हे यान प्रक्षेपित करण्यात आले.  Luna-25 लँडरला 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते. 

 23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार

चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. मिशन मूनचा आणखी एक टप्पा पार करताना आज पहाटे 1.50 वाजता विक्रम लँडरचे यशस्वीरित्या डी-बूस्टिंग करण्यात आले. म्हणजेच चांद्रयान-3 चा वेग कमी करण्यात यश आले. इस्रोने या संदर्भात माहिती दिली. विक्रम लँडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार असून, वेळही ठरली आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी उतरणं अपेक्षित आहे.