वॉशिंग्टन : अमेरिकेत एका सलुन मालकाला आपल्या कर्मचाऱ्याचं काम इतकं आवडलं की, त्याने फक्त 1 डॉलर म्हणजेच 75 रुपयात आपलं सलून देऊन टाकलं.
सलूनचे मालक पियो इम्पेरती (Pio Imperati) यांनी म्हटलं की, 'हेअर स्टायलिस्ट कॅथी मौरा (Kathy Moura) ने अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं काम केलं. ज्यामुळे मी खूप खूश झाले. ती एक चांगली बार्बर आहे. तिची आणि माझी मैत्री नेहमी कायम राहावी. त्यामुळे मी माझं इटली येथील सलून तिला फक्त 1 डॉलरमध्ये विकलं.'
मौरा पियो मात्र इम्पेरती यांना भाडं देत राहिल. पण तिला हे दुकान फक्त एका डॉलरमध्ये मिळाल्याने तिला सलूनसाठी लागणारे सर्व उपकरणं आणि वस्तू मोफत मिळाल्याने तिचा खर्च वाचणार आहे. 79 वर्षीय इम्पेरती एक स्वतंत्र कंत्राटदार म्हणून काम करतात. कॅथी मौरा हायस्कुलमधून पास झाल्यानंतर तिला त्यांनीच नोकरीची संधी दिली होती.
सलूनची मालकीन झाल्यानंतर कॅथी मौराने म्हटलं की, 'माझं स्वप्न होतं की, एक दिवस मी माझं स्वत:चं सलून बनवावं. पण ते आज शक्य झालं.' यूएस न्यूज रिपोर्टनुसार, तिने म्हटलं की, आम्ही एक कुटुंबाप्रमाणे होतो. ते सलून मध्ये येणाऱ्या प्रत्येकासोबत समान व्यवहार करायचेय.